ETV Bharat / state

विजयाच्या जल्लोषात न रमता आमदार धावले शेतकऱ्यांच्या मदतीला - संजय गायकवाड यांनी पिकांची पाहणी केली

विधानसभा निवडणुकीत विजयानंतर राज्यभरात एकीकडे ठिकठिकाणी विजयाच्या जल्लोष आणि मिरवणुका, असे वातावरण पहायला मिळत आहे. मात्र, बुलडाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी जल्लोषात न रमता शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे पसंत केले.

बुलडाण्याचे आमदार संजय गायकाड यांची शेतकऱ्यांना भेट
author img

By

Published : Oct 26, 2019, 10:34 AM IST

बुलडाणा - गुरूवारी राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. निवडून आलेले बहुसंख्य आमदार आणि कार्यकर्ते विजयाचा आनंद घेत आहेत. मात्र, याला बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड अपवाद आहे. 24 ऑक्टोबरला निवडून आल्यानंतर त्यांनी सत्कार समारंभात न रमता परतीच्या पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणे योग्य समजले. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी बुलडाणा तालुक्यातील वरवंड व डोंगरखंडाळा परिसरातील शेतकऱ्यांची भेट घेतली.

विजयाच्या जल्लोषात न रमता, आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पहाणी केली

वरवंड आणि डोंगरखंडाळा येथील शेतीची पाहणी केल्यानंतर गायकवाड यांनी दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच बुलडाणा-मोताळा तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

हेही वाचा... मलकापूरमध्ये काँग्रेसचे राजेश ऐकडे विजयी; भाजपचे चैनसुख संचेतींचा धक्कादायक पराभव

गेल्या ५ ते ६ वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सतत दुष्काळाचा सामना करत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाही मागील चार दिवसापासून बुलडाणा व मोताळा तालुक्यातील वरवंड, डोंगरखंडाळा, भादोला आदी परिसरातील हजारो हेक्टर शेतीमध्ये उभ्या असलेल्या सोयाबीन, ज्वारीच, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. ज्वारी आणि सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आले होते, तेही निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे.

हेही वाचा... एकीकडे उमेदवारांमध्ये निकालाची धाकधूक, तर खामगावात विजयी मिरवणुकीची तयारी

आमदार संजय गायकवाड यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय कृषी कार्यालयात तातडीची बैठक बोलावली. यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बुलडाणा व मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्वे करावा. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला असेल, त्या त्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरून तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, असे निर्देश गायकवाड यांनी दिले. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देऊन दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी घुगे यांना सादर केले.

हेही वाचा... 'भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे...'; वरळीत झळकले पोस्टर्स

Intro:Body:बुलडाणा:- निवडणूकीचा निकाल लागला निवडणून आलेले उमेदवार सध्या सत्कार समारंभामध्ये व्यक्त असल्याचे दिसत आहे मात्र याला अपवाद आहे बुलडाणा विधानसभेतून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड त्यांनी गुरुवारी 24 ऑक्टोबरला निवडून आल्यानंतर त्यांच्या हितचिंतकांकडून सत्कार करण्यासाठी अलेल्याचे सत्कार न स्विकारत अतिवृष्टीमूळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला ते आज शुक्रवारी 25 ऑक्टोबरला धावून गेले सकाळीच त्यांनी बुलडाणा तालुक्यातील वरवंड व डोंगरखंडाळा परिसरातील शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसान झालेल्या पिकांची व शेतीची पाहणी केली व एकरी ५० हजार रुपये आर्थीक मदत देवून दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहिर करण्यात यावे, अशा मागणी केली..

गेल्या ५ ते ६ वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सतत दुष्काळाचा सामना करत आहे. निसर्गाच्या
लहरीपणामुळे याही वर्षी गेल्या चार दिवसापासून बुलडाणा व मोताळा तालुक्यातील वरवंड, डोंगरखंडाळा, भादोला आदी परिसरात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतीमध्ये शेतात उभे असलेल्या सोयाबीन, कापलेले सोयाबीन, ज्वारीचे पिक व शेतामध्ये उभ्या केलेल्या सुड्या तसेच बोंड फुटलेले कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. ज्वारी आणिसोयाबीनला कोम फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास निसर्गाने हेरावुन घेतला. ऐन दिवळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे झालेले आहे. ही माहिती आ.संजय गायकवाड यांना मिळताच त्यांनी तात्काळ सकाळी या परिसरात शेतकरी अशोक पाटील, राहुल तुळशीराम जेऊघाले यांच्या शेतात प्रत्यक्ष जावून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तात्काळ या नुकसानीचा आढावा घेण्याकरिता आज दुपारी चार वाजता उपविभागीय
कृषी कार्यालयात कृषी महसूल व पंचायत समिती च्या कार्यालयातील व कर्मचाऱ्यांची आमदार संजय गायकवाड यांनी तातडीची बैठक बोलावून सर्व
अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बुलडाणा व मोताळा तालुक्यातील शेताच्या बांधावर जाऊन ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता सर्वे करावा व तो सर्वे जिल्हाधिकाऱ्यांमार्फतशासनाला पाठवावा तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला असेल त्या-त्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरून पिक विमा कंपनीकडून त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश आमदार संजय गायकवाड यांनी दिले.तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थीक मदत देवून दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहिर करण्यात यावे, याअशा मागणीचे निवेदन आज २५ आॅक्टोंबर रोजी खासदार प्रतापराव जाधव यांच्या स्वाक्षरीने आ.संजय गायकवाड, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत व प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मागणिसंदर्भात निवासी जिल्हाधिकारी श्री. घुगे यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनावर श्रीकृष्ण शिंदे, लखन गाडेकर, विजय साठे, अरविंद होंडे, सचिन परांडे, कुणाल गायकवाड, गजानन उबरहंडे, चंद्रकांत बर्दे, ओमसिंग राजपूत, नयन शर्मा, विनोद बोदडे, गोपाल डिके, मनोज पाटील, बाप्पु देशमुख, राजु मुळे, सुनिल गवते, संजय पाटील, प्रविण निकर्डे, गजानन उबरहंडे आदी उपस्थित होते.

बाईट :- संजय गायकवाड, शिवसेना आमदार बुलडाणा

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.