ETV Bharat / state

कामगारांच्या गैरसोयीबद्दलचा प्रश्न विचारताच कामगार मंत्री कुटेंनी घेतला काढता पाय

जिल्ह्यातील कामगार कार्यालयात होत असलेल्या बांधकाम कामगारांच्या गैरसोयीप्रकरणी प्रश्न विचारताच राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी ईटीव्ही भारतच्या पत्रकाराला कॅमेरा बंद करायला सांगून तिथून काढता पाय घेतला. ही घटना आज(15 ऑगस्ट) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात घडली.

कामगारांच्या गैरसोयीप्रकरणी प्रश्न विचारताच कामगार मंत्री डॉ.कूटे भडकले
author img

By

Published : Aug 15, 2019, 6:20 PM IST

Updated : Aug 15, 2019, 11:44 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील कामगार कार्यालयात होत असलेल्या बांधकाम कामगारांच्या गैरसोयीप्रकरणी प्रश्न विचारताच राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनील उत्तर देणे टाळले. एवढेच नाही तर ईटीव्ही भारतच्या पत्रकाराला कॅमेरा बंद करायला सांगून त्यांनी तिथून काढता पाय घेतला. ही घटना आज(15 ऑगस्ट) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात घडली.

कामगारांच्या गैरसोयीप्रकरणी प्रश्न विचारताच कामगार मंत्री डॉ.कूटे भडकले

शासनाच्या कामगार खात्यामार्फत कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात. योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगार नोंदणी करणे आवश्यक असल्याने शेकडो कामगार सरकारी कार्यलयात येतात. या प्रक्रियेत कामगारांची हेळसांड होत आहे. त्यामुळे, नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन करण्याविषयी कुटे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, कुटे यांनी कॅमेरा बंद करायला सांगून उत्तर देण्यास स्पष्ट नकार दिला.

Intro:Body:बुलडाणा : कामगार मंत्री डॉ.संजय .कूटेंच्याच बुलडाणा जिल्ह्यात कामगार कार्यालयात बांधकाम कामगाराची हेळसांड होत असल्याबाबत राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांना इ टीव्ही ने प्रश्न विचारताच डॉ कुटे भडकले आणि कॅमेरा खाली करण्याचं इशारा केल्याची घटना गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी घडली.इटीव्ही रिपोर्टरचा पूर्ण प्रश्न न ऐकताच आणि कामगारांची कश्याप्रकारे हेळसांड होत आहेत याबाबत माहिती न घेताच मंत्री डॉ..कूटेंनी तेथून काढता पाय घेतला.विशेष म्हणजे इटीव्ही रिपोर्टर त्यांना असा प्रश्न विचारणार होते की कामगार कार्यालयामध्ये कामगार नोंदणी करतांना होत असलेली हेळसांड थांबविण्यासाठी कामगार नोंदणी ऑनलाइन करणार आहे का? मात्र त्यांनी काहीच न ऐकता कॅमेरा खाली करून लावून ते भडकले..

शासनाच्या कामगार खात्यामार्फत मार्फत कामगारणसाठी विविध योजना उपलब्ध असून त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार नोंदणी करने आवश्यक असल्याने जिल्हाभरातून शेकडो कामगार सरकारी कार्यलयात जमा होत आहे व नोंदणी करतांना त्यांची हेळसांड होत असून कामगार कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची रिक्त पदाची आणि दलालांची डोकेदुखी आहे आणि हे होत आहे.राज्याचे कामगार मंत्री डॉ.संजय कुटे यांच्या बुलडाणा जिल्ह्यातच...यामुळे जिल्हाभरातून आलेल्या कामगारांनी रोष व्यक्त केला. याबाबत आज गुरुवारी स्वतंत्र्यदिनी कामगार मंत्री ना. कुटे यांनी ध्वजारोहनांतर दिलेल्या भाषणातून कामगार विभागाचा कारभार सांभाळत असतांना आतापर्यंत फक्त २ ते ३ लक्ष कामगारांची नोंदणी झालेली होती मात्र मागच्या काळात प्रयत्नपूर्वक १६ लक्ष कामगारांची नोंद करण्यात आली असून कामगारांना सर्व सुख सुविधा पुरविण्यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे सांगितले. मात्र कामगारांची हेळसांड होत असल्याने इ टीव्ही ने कामगार मंत्री डॉ..कूटेंना याबाबत प्रश्न विचारण्यास सुरवात करताच कामगारांची हेळसांड हा शब्द ऐकताच मंत्री डॉ.कुंटे भडकले आणि कॅमेरा खाली करायला लावला यावेळी ते म्हणाले आज सणाचा स्वातंत्र्यांच्या दिवस असून आज हे काय प्रश्न विचारताय असं सांगून त्यांनी तिथून काढता पाय घेतला विशेष म्हणजे इटीव्ही रिपोर्टर त्यांना असा प्रश्न विचारणार होते की कामगार कार्यालयामध्ये कामगार नोंदणी करतांना होत असलेली हेळसांड थांबविण्यासाठी कामगार नोंदणी ऑनलाइन करणार आहे का? मात्र त्यांनी काहीच न ऐकता ते निघून गेले..

बाईट:- डॉ.संजय कुटे,कामगार मंत्री

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Aug 15, 2019, 11:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.