बुलडाणा - तिकीट दिले नाही म्हणून मी काय शांत बसणारा आहे का? तर विकासकामांसाठी सरकारला बिल्कुल स्वस्थ बसू देणार नाही, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले.
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे युतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ काल (गुरुवार) आयोजित सभेदरम्यान केले. सबका साथ सबका विकास हा भाजपचा अजेंडा आहे. त्यामुळे मतदारांनी कमळालाच निवडावे आणि युतीच सरकार आणावे, अस आवाहनही खडसेंनी उपस्थिताना केले आहे. सर्व मुद्दे मांडत असताना खडसेंनी तिकीट दिले नाही म्हणून मी काय शांत बसणारा आहे का. तर विकासकामांसाठी सरकारला बिल्कुल स्वस्थ बसू देणार नसल्याचे सांगत आपल्या मनातली खदखद व्यक्त केली.