ETV Bharat / state

किराणा दुकानात घुसले अस्वल...आणि केली अशी करामत!

बुलडाणा शहराच्या चारही बाजूने अभयारण्य असल्याने या अभयारण्यातील हिंसक प्राणी जवळच्या गावांमध्ये अनेक वेळा घुसतात. यामुळे अभयारण्यालगतच्या गावकऱ्यांना नेहमी सतर्क राहावे लागते. आज एका किराणा दुकानात मोठे अस्वल घुसल्याने संपूर्ण गावामध्ये एकच खळबळ उडाली होती.

किराणा दुकानात घुसले अस्वल...
author img

By

Published : Jul 26, 2019, 8:22 PM IST

बुलडाणा - तालुक्यात गिरडा गावातील एका किराणा दुकानात मोठे अस्वल घुसल्याने संपूर्ण गावामध्ये एकच खळबळ उडाली होती. या अस्वलाने एक तास ठिय्या दिला होता. अस्वलाने दुकानातील सामानाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.

किराणा दुकानात घुसले अस्वल...
बुलडाणा शहराच्या चारही बाजूने अभयारण्य असल्याने या अभयारण्यातील हिंसक प्राणी जवळच्या गावांमध्ये अनेक वेळा घुसतात. यामुळे अभयारण्यालगतच्या गावकऱ्यांना नेहमी सतर्क राहावे लागते. आज (शुक्रवारी) सकाळी गिरडा गावात अस्वल घुसल्याने एकच गोंधळ उडाला होता. हे अस्वल फक्त गावातच घुसले नाही, तर त्याने एका किराणा दुकानाचा ताबा घेतला. एक तास दुकानात बसून किराणा दुकानातील तेलावर ताव मारत दुकानातील सामानाची नासधूस केली. अस्वल दुकानातून बाहेर पडत असताना एका महिलेचे लक्ष अस्वलावर पडले. नंतर त्या महिलेने आरडाओरडा केला. अस्वलाने एका झुडपाचा आसरा घेतला. अस्वलाला पाहण्यासाठी गावातील लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे घाबरलेल्या अस्वलाने तिथून पोबारा केला. अनावधानाने या अस्वलाने कुणावरही हल्ला केला नाही. या घटनेने गिरडावासी भयभीत झाले आहेत. आताही अस्वलाचे दर्शन नेहमीच गावकऱ्यांना घडत आहे. वन परिक्षेत्र अधिकारी आणि जिल्हा वन अधिकारी यांनी गिरडा गावामध्ये अस्वलाने केलेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे. गावाला लागून संरक्षण भिंत बांधण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात. दुकानदाराला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गिरडा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

Intro:Body:बुलडाणा:- बुलडाणा शहराच्या चारही बाजूने अभयारण्य असल्याने या अभयारण्यातील हिंसक प्राणी जवळच्याच गावांमध्ये अनेक वेळा घुसतात यामुळे अभयारण्य लगतच्या गावकऱ्यांना नेहमी सतर्क राहावे लागते. आज शुक्रवारी 26 जुलैच्या सकाळी बुलडाणा तालुक्यातील गिरडा या गावात असेच एक मोठे अस्वल घुसल्याने संपूर्ण गावामध्ये एकच खळबळ उडाली एका किराणा दुकानात या अस्वलाने एक तास ठिय्या दिला यावेळी दुकानातील सामानाची नासधूस करीत खाण्याच्या तेलावर हि ताव मारले.  

बुलडाणा जवळील गिरडा गावात अस्वल घुसल्याने एकच खळबळ माजली हा अस्वल नुसता गावातच घुसला नाही तर त्याने चक्क किराणा दुकानाचा ताबा घेत एक तास दुकानात बसून चक्क किराणा दुकानातील तेलावर ताव मारत दुकानातील सामानाची नासधूस केली..दुकानातून बाहेर पडत असतांना एका महिलेचं लक्ष अस्वलावर पडल्या नंतर त्या महिलेने आरडाओरडा केला तेव्हा अस्वलाने एका झुडपाचा आसरा घेत तिथे अर्धा तास अस्वल थांबले तेव्हड्यात गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते...घाबरलेल्या अवस्थेत तिथून अस्वलाने पोबारा केला. अनावधानाने या अस्वलाने कुणावरही हल्ला केला नाही.

या घटनेने गिरडावासी भयभीत झाले असून
वन्यप्राण्यांनी यापूर्वी केलेल्या हल्ल्यात जीवसुद्धा गमवावा लागला आहे. आताही अस्वलाचे दर्शन नेहमीच गावकऱ्यांना घडत आहे. वन्यप्राण्यांच्या भितीने आता गिरडावासी ग्रासले आहे.वनपरिक्षेत्रअधिकारी तसेच जिल्हा वन अधिकारी यांनी गिरडा गावातील अस्वलाने केलेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे व गावाला लागून संरक्षण भिंत बांधण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात. तसेच त्वरीत नुकसानभरपाई द्यावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा गिरडा वासियांनी दिला आहे.

बाईट:- गावकरी

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.