ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : इंदिरा गांधी जयंतीनिमित्त भारत जोडो यात्रेत असणार ९० टक्के महिलांचा सहभाग - Indira Gandhi Jayanti

इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ( Indira Gandhi Jayanti ) १९ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत ९० टक्के महिलांचा सहभाग असेल. असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.

Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रा
author img

By

Published : Nov 18, 2022, 5:47 PM IST

शेगाव : भारत जोडो यात्रेला ( Bharat Jodo Yatra ) महाराष्ट्रातील जनतेने मोठे प्रतिसाद व प्रेम दिलेले आहे. हे काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुलजी गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटांशासमोर झुकले नाहीत. हे सांगताना त्याची तुलना सावरकरांशी केली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत. त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. उद्या १९ तारखेला नारीशक्तीचा स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ( Indira Gandhi Jayanti ) उद्या दि. १९ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत ९० टक्के महिलांचा सहभाग ( ninety percent women participate in bharat jodo yatra ) असेल. असेही त्यांनी सांगितले.

नाहक वातावरण तापवणे सुरू : शेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले की, सावरकारांच्या मुद्दयावरून महाराष्ट्रातील काही पक्ष व संघटना नाहक वातावरण तापवत आहेत. सावरकांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे ते कसे नाकारता? असा सवाल उपस्थित करून भारत जोड़ो यात्रेचा हा एकच मुद्दा नाही. यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसने इतिहासाची मोडतोड करुन मांडणी केलेली नाही. द्विराष्ट्रवादाचा सिंद्धात सावरकर यांनीच मांडला. १९४२ च्या भारत छोडो, चले जावच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होते हे ऐतिहासिक सत्य आहे.

भारत जोडो यात्रेला समर्थन : भारत जोडो यात्रेला प्रचंड समर्थन मिळत असल्याने काही लोक विरोध करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुलजी गांधी यांच्या सुरक्षेची सर्व भारतयात्रींना चिंता आहे, परंतू त्यांच्या सुरक्षेत कसलीही तडजोड केली जाणार नाही. भारत जोडो यात्रेत उद्या १९ तारखेला नारीशक्तीचा स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ( Indira Gandhi Jayanti ) उद्या दि. १९ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत ९० टक्के महिलांचा सहभाग असेल. महिलांचा राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्याचा निर्णय स्व. पंतप्रधान इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी घेतला यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देशभर महिलांचे प्रतिनिधित्व वाढलेले आहे. उद्या नारीशक्तीची भव्य दर्शन भारत जोडो यात्रेत दिसेल असे जयराम रमेश यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.