बुलडाणा - संतनगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरूषांचे भव्य पुतळे बसविल्यानंतर, शहराच्या सौंदर्यात भर पडली असून हे पुतळे तरुणाईकरता प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत माजी कामगार मंत्री व आमदार संजय कुटे यांनी व्यक्त केले. शहरामध्ये कुटे यांच्या हस्ते पुतळ्यांचे लोकार्पण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा -
शिवजयंतीनिमीत्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह मुंबईच्या महापौरांकडून अभिवादन
शिवजयंतीचे औचित्य साधून नगराध्यक्षा शकुंतला बुच आणि आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडला. यापूर्वी नागरिकांच्या मागणीवरुन नगरपालिकेमध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करुन तत्कालीन मुख्याधिकारी व माजी नगराध्यक्ष शरदसेठ अग्रवाल यांनी पुतळ्यासाठी प्रत्येकी 21 लक्ष रुपयांचा ठराव मंजूर केला होता.
हेही वाचा -