ETV Bharat / state

Obscene Messages On WhatsApp : व्हॉट्सॲप गृपवर टाकले अश्लील मेसेज, शेगांवचे गटशिक्षणाधिकारी निलंबित - व्हॉट्सॲप ग्रुपवर अश्लील मेसेज

एका महिलेबद्दल व्हॉट्सॲप ग्रुपवर अश्लील मेसेज ( Obscene Messages On WhatsApp ) टाकल्याने शेगांवच्या ( Shegaon Panchayat Samiti ) गटशिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रकाश केवट असे त्यांचे नाव ( Prakash Kevat Suspended ) आहे. १ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती.

शेगांवचे
शेगांवचे
author img

By

Published : Dec 31, 2021, 9:26 PM IST

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव पंचायत समितीचे ( Shegaon Panchayat Samiti ) गटशिक्षणाधिकारी यांना कार्यालयीन व्हॉट्सॲप गृपवर एका महिलेबद्दल अश्लील मेसेज ( Obscene Messages On WhatsApp ) टाकणे चांगलेच भोवले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या एका आदेशाने शेगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. निलंबित केलेल्या अधिकाऱ्याचे नाव प्रकाश केवट ( Prakash Kevat Suspended ) असे आहे.

असा आहे प्रकार

शेगाव पंचायत समितीमध्ये गटशिक्षण अधिकारीपदाचा प्रभार पहुरजिरा येथील केंद्रप्रमुख प्रकाश केवट यांच्याकडे होता. यावेळी पंचायत समिती अंतर्गत कार्यालयीन कामकाज असलेल्या व्हॉट्सॲप गृपवर प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट यांनी १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी एका महिलेबद्दल अश्लील मॅसेज टाकला होता. त्यामुळे गृपमध्ये असलेल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापकांची कुचंबणा झाली. प्रभारी गटशिक्षणाधिकारी असलेल्या अधिकाऱ्यानेच मेसेज टाकल्याने अनेक मुख्याध्यापक, शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच काहींनी केवट यांना माहितीही दिली होती की, आपल्याकडून व्हॉट्सॲप गृपमध्ये अश्लील मेसेज टाकण्यात आला आहे, तो डिलीट करावा. मात्र डिलिट करण्याऐवजी ( Delete For Everyone ) त्यांनी ग्रुप सोडला. त्यांना मॅसेज डिलीट करता आला नाही, त्यामुळे तो मेसेज तसाच राहिला.

चौकशीअंती आढळले दोषी

या घटनेनंतर काही शिक्षक महिला आणि शिक्षकांनी बुलडाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे ( Buldhana Education Officer ) संपर्क साधला. यावेळी अश्लील मेसेजमध्ये उल्लेख असलेल्या महिलेने तक्रार केल्यास कारवाई होऊ शकेल असे सांगत त्यावेळी त्यांना परत पाठवण्यात आले होते. ८० दिवस उलटल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते ( IAS Bhagyashree Vispute ) यांनी दखल घेत प्रकरणाची चौकशी केली. चौकशी अंती गटशिक्षणाधिकारी दोषी आढळल्याने एका आदेश काढून शेगाव गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट यांना विसपुते यांनी २० डिसेंबर रोजी निलंबित केले आहे. त्यानुसार प्रकाश केवट यांचे मुख्यालय जळगाव जामोद पंचायत समिती ( Jamod Panchayat Samiti ) ठेवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.