ETV Bharat / state

शाळेला जात असताना विहिरीत पडून विद्यार्थीनीचा मृत्यू - ग्राम बेलाड बुलडाणा शाळकरी मुलीचा मृत्यू

दिव्या गोविंदा संबारे (रा. ग्राम बेलाड ता. मलकापूर) असे मुलीचे नाव असून ती शाळेत सहावीच्या वर्गात शिकत होती. आज गुरुवारी (११ फेब्रुवारी) साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे मलकापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

बुलडाणा
बुलडाणा
author img

By

Published : Feb 11, 2021, 8:13 PM IST

बुलडाणा - शाळेला जात असताना रस्त्याकडेच्या विहिरीत पडल्याने १२ वर्षीय विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिव्या गोविंदा संबारे (रा. ग्राम बेलाड ता. मलकापूर) असे मुलीचे नाव असून ती शाळेत सहावीच्या वर्गात शिकत होती. आज गुरुवारी (११ फेब्रुवारी) साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे मलकापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी दिव्या निघाली होती. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या मागील रस्त्यावरील विहिरीत दिव्या पडल्याने तिचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद माळी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतील पाणी मोटारींद्वारे उपसा करून दिव्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ, भा.रा.काॅ शहराध्यक्ष राजू पाटील, पत्रकार गजानन ठोसर यांच्यासह आदींनी धाव घेतली. दुपारी शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात दिव्यावर बेलाड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. झालेल्या या दुर्दैवी घटनेने सगळ्यांचे मन सुन्न झाले असून मलकापूर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.