ETV Bharat / state

मलकापूर तहसिलदार कार्यालयात महिला कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मलकापूर तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अलका नंदु चव्हाण असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मलकापूर तहसिलदार कार्यालय
author img

By

Published : Nov 16, 2019, 8:49 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर तहसील कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याने विष घेतल्याची घटना घडली. अलका नंदु चव्हाण असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. अलका यांना मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जळगाव येथे पाठवण्यात आले. महिला कर्मचाऱ्याने कार्यालयातच विष घेतल्याने मलकापुरात खळबळ उडाली आहे.

तहसिलदार कार्यालयात महिला कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अलका चव्हाण या मलकापूर तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर त्यांनी कार्यालय उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे कारण गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांना न्यायालयाचा दिलासा; 'ती' याचिका फेटाळली

घटना घडली त्यावेळी तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे या तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. संबधित प्रकरणाची माहिती मिळताच तहसीलदार डोईफोडे यांनी रुग्णालयात जावून महिला कर्मचाऱ्याची विचारपूस केली. सध्या अलका चव्हाणांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी दिली.

Intro:Body:बुलडाणा: - बुलडाणा जिल्ह्यातील मलकापुर तहसील कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने चक्क तहसील कार्यालयातच विष प्राशन केल्याची घटना घडलीय... या महिला कर्मचाऱ्याला अगोदर मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भर्ती केले तर नंतर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जळगांव ला हलविलेय.मात्र  कार्यालयातच महिला कर्मचाऱ्यानी विष प्राशन केल्याने मलकापुरात एकच खळबळ उडालीय.. 

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागात  लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या अलका नंदु चव्हाण या महिला कर्मचाऱ्याने दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर तहसिल कार्यालय उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय..यामुळे परिसरात खळबळ उडालीय.. यावेळी महिला तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे हे दौऱ्यावर होते माहिती मिळताच तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी रुग्णालयात जावून महिला कर्मचाऱ्याची तब्बेतेची विचारपूस केली. सध्या या महिला कर्मचाऱ्यांची  प्रकृती धोक्याच्या बाहेर असून तिला पुढील उपचारार्थ जळगांव (खान्देश) येथे हलविण्यात आलेय..

मात्र याविषयी तहासिलदार स्वप्नाली डोईफोडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी प्रकरणाची संपूर्ण चौकशी.करून कारवाई करणार आहे..महिला कर्मचाऱ्याने तहसिल कार्यालतच कोणाच्या जाच्याला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला हे महिला कर्मचाऱ्याची प्रकृतित सुधारणे नंतरच समोर येईल..

बाईट:- डॉक्टर,मलकापूर

बाईट:- कू.स्वप्नाली डोईफोडे,तहसीलदार मलकापूर

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.