बुलडाणा - सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याबाबतची घोषणा आज शुक्रवारी 19 नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. दिल्लीच्या सीमा भागामध्ये जे शेतकऱ्यांचा आंदोलन गेल्या एक वर्षांपासून सुरू आहे. त्या शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने हा एक विजय आहे, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली.
काय म्हणाले रविकांत तुपकर -
मी अनेकवेळा सांगितलं की, सरकार पेक्षा शेतकऱ्यांची ताकद मोठी असते. दिल्लीच्या सीमा भागामध्ये एक वर्षपासून आंदोलन करणाऱ्या तमाम शेतकऱ्यांचा मी अभिनंदन करतो, सलाम करतो, की तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून या केंद्र सरकारची मस्ती उतरवली त्यांचा माज उतरवला. परंतु जी घोषणा नरेंद्र मोदींनी केली आहे. याचा तातडीने अद्यादेश जारी झाले पाहिजे. हा कायदा म्हणून पुढे यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे, असेही तुपकर म्हणले.
बुलडाण्यात सुरू आहे सत्याग्रह आंदोलन -
ते केंद्र सरकारने सोयाबीनचे प्रति क्वि. दर 8 हजार रुपये व कापसाचा दर प्रति क्वि. 12 हजार रुपये स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे, पाम तेलावरचा आयात कर पूर्वीप्रमाणे 30 टक्के करण्यात यावा, सोयाबीनवर लागू असलेला जीएसटी हटवण्यात यावा. या व अन्य मागण्यांसाठी बुलडाण्यात आपल्या निवासस्थानाजवळ अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करीत आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.