बुलडाणा - राज्यात बारावीची बोर्ड परीक्षा सुरू असल्याने कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. मात्र, या अभियानाचा बुलडाणा जिल्ह्यात बोजवारा उडाला असून एका विद्यालयात लोकप्रतिनिधीच्या मुलीला पेपर लिहिण्यासाठी जास्त वेळ दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील श्री शिवाजी हायस्कूल या परीक्षा केंद्रामध्ये विज्ञान शाखेच्या रसायनशास्त्र विषयाच्या पेपर दरम्यान हा प्रकार घडला. स्थानिक लोक प्रतिनिधीच्या मुलीला नियोजित वेळे व्यतिरिक्त अर्धा तास जास्त वेळ देऊन मुख्याध्यापकांच्या दालनात पेपर लिहिण्याची परवानगी देण्यात आली. हा प्रकार परीक्षा केंद्रावरील इतर विद्यार्थ्यांनी गोंधळ करत याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
हेही वाचा - काल्पनिकपेक्षा वास्तववादी चित्रपट अधिक जवळचे वाटले - नागराज मंजुळे
या प्रकरणाची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांनी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन पानझाडे यांनी दिले.