ETV Bharat / state

जिल्हा कर्मचारी व अधिकारी समन्वय महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - buldhana

अधिकारी-कर्मचाऱ्यांना मानसिक ताण देणाऱ्या, छळ करणाऱ्या आणि अपप्रवृत्तीच्या लोकांविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाई करण्याची मागणी मोर्चा काढण्यात आला. माहिती अधिकाराच्या नावाखाली काहीजण ब्लॅकमेलिंग करत असल्याचा प्रकार समोर येत आहे.

बुलडाणा1
author img

By

Published : Feb 19, 2019, 1:48 PM IST

बुलडाणा - जिल्हा कर्मचारी व अधिकारी समन्वय महासंघातर्फे सोमवारी (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मानसिक ताण देणाऱ्या, छळ करणाऱ्या आणि अपप्रवृत्तीच्या लोकांविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील शेकडो अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

स्थानिक गांधी भवन येथून मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आले, त्यांना सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचे ठरवले. सुरुवातीला गांधी भवन येथून एल्गार मोर्चाला सुरुवात करण्यात आली, बाजार लाईन, जनता चौक, कारंजा चौक येथून एल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले.

कसला तरी हेतू डोळ्यासमोर ठेऊन माहिती अधिकारात माहिती मागणे, भ्रष्टाचार निर्मूलन या आशयाच्या विविध बेकायदेशीर समित्यांमार्फत तक्रारी करणे. अनेक प्रकाराद्वारे विविध अर्ज, तक्रारी करणाच्या कार्यकत्यांचा सूळसुळाट झालेला आहे. अशाच प्रकारच्या प्रकरणात बुलडाणा तहसीलदार सुरेश बगळे यांचेवर बेकायदा कामासाठी वारंवार दबाव टाकून आणि रस्त्यात पिस्तुलाचा धाक दाखवून मिठ्ठू परमेश्वर जालान या व्यक्तीने त्यांना धमकावले. याबाबत संबंधिताला अटक करण्यात आलेली आहे. चुकीचा हेतू डोळ्यासमोर ठेऊन तक्रारी करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कार्यवाई होत नसल्यामुळे त्यांची हिम्मत वाढत चालली आहे.

undefined

प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी हे तणावाखाली काम करत आहेत. वास्तविक माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्यास आम्ही त्यांना उपलब्ध असलेली माहिती देण्यास बांधिल आहोत. परंतु, बरीच पदे रिक्त असल्याने बहुतांश लोकांकडे अतिरिक्त प्रभार आहेत. त्यामुळे एखाद वेळी कामाच्या व्यापामुळे माहिती देण्यास दिरंगाई होते. त्याचाच गैरफायदा घेऊन अपप्रवृत्तीचे लोक ब्लॅकमेलींग सुरू करतात. ब्लॅकमेलींगला प्रतिसाद न दिल्यास वरिष्ठांकडे तक्रारी केल्या जातात. याप्रकारामुळे अधिकारी-कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत, अशा प्रकारच्या अपप्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई व्हावी, यासाठी आंदोलन करण्यात आले. सभेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Intro:बुलडाणा:- बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा कर्मचारी व अधिकारी समन्वय महासंघाचा आज सोमवारी 18 फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला या मोर्च्याच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मानसिक ताण देणारे ब्लैकमेलर आणि अपप्रवृत्तीच्या लोकांविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी जिल्ह्यातील शेकडो अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.Body:स्थानिक गांधी भवन येथून मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम पुलवामा येथील शहीदांना श्रध्दांजली अर्पन करण्यात आली. व या हल्ल्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले त्यांना सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचे ठरले.सुरुवातीला गांधी भवन येथून एल्गार मोर्च्याला सुरवात करण्यात आला बाजार लाईन,जनता चॉक, कारंजा चॉक येथून फिरत एल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धळकला यावेळी मोर्च्याचे रुपांतर सभेत करण्यात आले यावेळी यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये असद डोळ्यासमोर ठेवून माहितीचे अधिकारात माहिती मागणे, भ्रष्टाचार निर्मुलन या आशयाच्या विविध बेकायदेशीर समित्यांमार्फत तक्रारी करणे या व अशासारख्या अनेक प्रकाराद्वारे विविध अर्ज, तक्रारी करणाच्या कार्यकत्यांचा सुळसुळाट झालेला आहे अशाच प्रकारच्या प्रकरणांत तहसिलदार बुलडाणा श्री.सुरेश बगळे यांचेवर बेकायदा कामासाठी वारंवार दबाव टाकून आणि वाटसपवर पिस्तूलाचा धाक दाखयून मिठठू परमेश्वर जालान यांनी धमकावल्यावरुन संबंधिताविरुध्द बुलडाणा शहर येथे गुन्हा नोंदविण्यात येवून संबंधिताला अटक करण्यात आलेली आहे. असद हेतु डोळ्यासमोर ठेवून तक्रारी करणाच्या लोकांविरुध्द कोणतीही प्रतिबंधात्मक कार्यवाही
होत नसल्यामुळे त्यांची हिम्मत वाढत चालली आहे त्यामूळे प्रशासनामध्ये काम करणाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यामधे भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मिठठू जालान व त्यांच्यासारखे अनेक अपप्रवृत्ती माहिती अधिकार अधिनियम, भ्रष्टाचार निर्मुलन या सारख्या कायद्यांचा बेकायदेशीर वापर करुन प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांना वेठीस धरत आहेत. त्यामूळे प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी हे तणावाखाली काम करत आहेत. वास्तविक माहितीचे अधिकारात माहिती मागितल्यास आम्ही त्यांना उपलब्ध असलेली माहिती देण्यास बांधिल आहोत. परंतू बरीच पद रिक्त असल्याने बहुतांश लोकांकडे अतिरिक्त प्रभार आहेत. त्यामूळे एखादे वेळेस कामाच्या व्यापामूळे माहिती देण्यास दिरंगाई होते. त्याचाच गैरफायदा घेवून अपप्रवृत्तीचे लोक ब्लॅकमेलींग सुरु करतात. सदर ब्लॅकमेलींगला प्रतिसाद न दिल्यास वरीष्ठांकडे तक्रारी केल्या जातात वरीष्ठ पातळीवरुनही तक्रारीतील तयाची पडताळणी न करता त्या लोकांचे
दबावाखाली येवून अधिकारी कर्मचारी यांचेविरुध्द कार्यवाही प्रस्तावित करण्यात येते त्यामूळे कर्मचारी-अधिकारी हे अपप्रवृत्तीच्या लोकांमूळे तणावाखाली राहात असून वरीष्ठांच्या कार्यवाहीच्या धाकामूळे भितीचे वातावरणात राहात आहेत. विविध शासकिय व निमशासकीय कार्यालयातील अभिलेखांचे अवलोकन केले असता वारंवार अर्ज-तक्रारी करणाऱ्या अपप्रवृत्तींची माहिती संकलित करण्यात आलेली आहे. त्यांचा माहिती
मागणीतील विषयाशी किंवा तक्रारीतील विषयाशी कोणताही वैयक्तीक हितसंबंध किंवा सार्वजनिक हितसंबंध नसतांना फक्त ब्लॅकमेल करण्यासाठी व आर्थिक पिळवणूक करुन वेठीस धरणाच्या अपप्रवृत्तींना आळा घालून संबंधितांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी सभेत चर्चा करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.या एल्गार मोर्चामधे बुलडाणा जिल्ह्यातील शेकळोच्या संख्येने अधिकारी- कर्मचारी सहभागी होते. मोर्चामध्ये संघटना व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. .

बाईट:- 1) श्रीमती शिल्पा पवार, जिल्हाध्यक्ष दुर्गा मंच मु. ल. वि. अ.

2)सुरेश बगळे, अध्यक्ष ओ.बी.सी. कर्मचारी-अधिकारी

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.