ETV Bharat / state

'वसा आरोग्याचा' अंतर्गत महिलांना 'सॅनेटरी नॅपकीन'चे वाटप - सॅनेटरी नॅपकीनचे वाटप बुलडाणा बातमी

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यभरात 'वसा आरोग्याचा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील शेगावात हळदी-कुंकू, तिळगूळा सोबत प्रत्येक महिलेला दोन 'सॅनिटरी नॅपकीन'ही वाण म्हणून देण्यात आले आहे.

महिलांना सॅनेटरी नॅपकीनचे वाटप
महिलांना सॅनेटरी नॅपकीनचे वाटप
author img

By

Published : Feb 3, 2020, 12:24 PM IST

बुलडाणा - मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात. जिल्ह्यातील शेगावात हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. हळदी-कुंकू, तिळगूळा सोबत प्रत्येक महिलेला दोन 'सॅनिटरी नॅपकीन'ही वाण म्हणून देण्यात आले आहे. तसेच महिलांच्या आरोग्याची तपासणीही करण्यात आली आहे.

'वसा आरोग्याचा' अंतर्गत महिलांना 'सॅनेटरी नॅपकीन'चे वाटप

हेही वाचा- 'आम्हांला जनतेचे अपार समर्थन; दिल्लीकरांचं ठरलंय!'

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यभरात 'वसा आरोग्याचा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने प्रदेश सचिव नंदा पाऊलझगडे यांच्या वतीने शेगाव येथील 'श्री स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल' याठिकाणी शनिवारी 'हळदी कुंकवा'चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात १ हजारांच्यावर महिलांना हळदी कुंकू लावून, त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच तिळगूळासोबत प्रत्येकी दोन सॅनिटरी नॅपकीन वाण म्हणून देण्यात आले. सॅनेटरी नॅपकीनचा वापर आणि विल्हेवाट कशी करावी याबाबत जनजागृतीपर माहितीपत्रकही यावेळी महिलांना देण्यात आले.

Intro:Body:बुलडाणा: - मकर संक्रांति च्या निमित्ताने महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम सर्वत्र साजरा होत असतो मात्र बुलडाणा जिल्ह्यातील शेंगावात हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलाय. ते म्हणजे हळदी कुंकू लावून तिळगूळ सोबत प्रत्येक महिलेला दोन सॅनिटरी नॅपकिन वाण म्हणून देण्यात आलंय तर महिलांच्या आरोग्याची तपासणीही करण्यात आलीय हा उपक्रम महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात आलाय.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यभरात वसा आरोग्याचा हा उपक्रम राबविण्यात येतोय त्याअनुषंगाने प्रदेश सचिव नंदा पाऊलझगडे यांच्या वतीने शेगाव येथील श्री स्वामी समर्थ इंग्लिश स्कुल यांच्या याठिकाणी अनोख्या पद्धतीने शनिवारी १ फेब्रुवारी ला हळदी कुंकवाचा उपक्रम राबविला या कार्यक्रमांतर्गत १ हजाराच्या वर महिलांना हळदी कुंकू लावून त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली याशिवाय तिळगूळ देत असतांना प्रत्येकी दोन सॅनिटरी नॅपकिन वाण म्हणून देण्यात आले. याचबरोबर सॅनेटरी नॅपकिन चा वापर आणि त्याची विल्हेवाट बाबतचे जनजागृती माहितीपत्रकही देण्यात आली. या अनोख्या हळदी कुंकाच्या माध्यमातून महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकिन चा वापर वाढावा व त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यास प्रवृत्त करण्याचा उद्देश ठेवण्यात आलेला होता.


बाईट -
सौ. नंदा पाऊलझगडे (प्रदेश सचिव -महिला रा.कॉ.)
सौ. पूनम राठोड, स्थानिक महिला

-वसीम शेख , बुलडाणाConclusion:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.