ETV Bharat / state

कोरोना : प्रशासनाकडून जमावावर निर्बंध; मात्र, महाविकास आघाडीचे मंत्री घेताहेत हजारोंच्या उपस्थितीत जंगी सत्कार - mob restriction in buldana

कोरोना विषाणू संसर्गापासून खबरदारी म्हणून राज्यातील जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणे, मोठ-मोठ्या यात्रा, उत्सव यांच्यावर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. मात्र, प्रशासनाच्या या आदेशाला महाविकास आघाडीच्या मंत्रीच जुमानत नसल्याचे समोर आले आहे. त्यांना कोरोनाविषयी गांभीर्य आहे की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Mar 10, 2020, 7:39 PM IST

Updated : Mar 10, 2020, 9:07 PM IST

बुलडाणा - कोरोना विषाणू संसर्गापासून खबरदारी म्हणून राज्यातील जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणे, मोठ-मोठ्या यात्रा, उत्सव यांच्यावर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. मात्र, प्रशासनाच्या या आदेशाला महाविकास आघाडीच्या मंत्रीच जुमानत नसल्याचे समोर आले आहे. हे मंत्री हजारोंच्या उपस्थितीत सत्कार स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे. यावरून कोरोना विषाणूबाबत महाविकास आघाडीचे मंत्री किती सतर्क आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

कोरोना
महाविकास आघाडीचे मंत्री घेताहेत हजारोंच्या उपस्थितीत जंगी सत्कार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील देशाची दुसऱ्या क्रमांकाची यात्रा असलेली सैलानी यात्रा, 8 मार्चचे महिला दिनाचे कार्यक्रम आणि ज्या सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी जमू शकेल, असे कार्यक्रम 6 मार्चलाच रद्द केले होते. हा निर्णय जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी घेतला. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी खामगावात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार स्वीकारला. शिवाय, डॉ. शिंगणे राज्याचे अन्न व औषध मंत्री असूनही त्यांनी रविवारी (8 मार्च) महिलादिनी हा सत्कार स्वीकारला, ही बाब गंभीर आहे.

प्रशासनाकडून जमावावर निर्बंध; मात्र, महाविकास आघाडीचे मंत्री घेताहेत हजारोंच्या उपस्थितीत जंगी सत्कार

शिंगणें यांच्या सत्कार कार्यक्रमावर जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सडकून टीका केली आहे. 'जमावबंदीच्या आदेशातून कोणालाही सूट मिळत नाही. एखादया विशिष्ट ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचा आदेश निघाला असेल तर, नागरिकांसह तो लोकप्रतिनिधी, मंत्री, प्रशासकीय अधिकारी या सर्वांना समानपणे लागू होतो. सगळ्यांनी शासनाच्या नियमांचे किंवा आदेशांचे पालन केले पाहिजे. कारण, शासन आपणच आणि आपणच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करायला लागलो तर लोकांमध्ये चुकीचा संदेश गेल्याशिवाय राहणार नाही,' अशा शब्दांत जाधव यांनी टीका केली.

हेही वाचा - CORONA VIRUS : हिंगोलीत बॉयलर दहा रुपये किलो; तरीही ग्राहकांची पाठ

'गेल्या एक महिन्यापूर्वी हा कार्यक्रम ठरविला होता. वारंवार विनंती करून सुद्धा ज्यांनी हा कार्यक्रम केला त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला नाही. मला नाइलाजाने जावे लागले. परंतु, कार्यक्रमाच्या ठिकाणी गेटवरच प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी आम्ही हॅण्डवॉश ठेवला होता. प्रत्येकाला हात स्वच्छ धुतल्यानंतरच तेथे प्रवेश देण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची सुद्धा काळजी कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही घेण्याचा प्रयत्न केला,' असे स्पष्टीकरण मंत्री शिंगणे यांनी आपली बाजू मांडताना दिले.

तर, मागील सरकारमध्ये आरोग्यमंत्री आणि स्वतः डॉक्टर आसलेल्या शिंगणेंना हॅण्डवॉशने कोरोनाचा विषाणू मरणार नाही, हे कसे कळले नाही, असा सवाल जाधव यांनी केला. 'याचे औषध सध्या जगभरात कुठेच उपलब्ध नसल्याने केवळ खबरदारी हाच कोरोनापासून वाचण्याचा उपाय ठरू शकतो. म्हणूनच प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीवर निर्बंध घातले आहेत,' असे ते पुढे म्हणाले. सध्या याची जोरदार चर्चा होत आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या भीतीने होळी-रंगपंचमीला नैसर्गिक रंगांचा वापर, चिनी रंगांकडे पाठ

Last Updated : Mar 10, 2020, 9:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.