ETV Bharat / state

बुलडाणा ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर, विजयाचा सर्वांचाच दावा - Buldhana gram panchayat election

ग्रामपंचायतीचे निकाल लागले. परंतु, वर्चस्व कोणाचे यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे नेते दावे-प्रतिदावे करत असल्यामुळे आपण भाऊ, दादा की साहेबांचे समर्थक आहोत यावरून संभ्रम निर्माण होत आहेत.

बुलडाणा
बुलडाणा
author img

By

Published : Jan 19, 2021, 8:02 AM IST

Updated : Jan 19, 2021, 9:16 AM IST

बुलडाणा :- जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे निकाल लागले. आमच्याच पक्षाने जास्त जागा जिंकल्या यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे नेते दावे-प्रतिदावे करत असल्यामुळे आपण भाऊ, दादा की साहेबांचे समर्थक आहोत यावरून संभ्रम निर्माण होत आहेत. राजकीय नेते 80 ते 90 टक्के उमेदवार आपलेच असल्याचा दावा करीत आहेत. प्रमुख चार राजकीय पक्षाचा विचार केला तर वर्चस्वाच्या या लढाईत प्रत्यक्ष उमेदवारांपेक्षा विजयी उमेदवार तीन पटीने जास्त भरतील असं चित्र आहे.

बुलडाणा ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर, विजयाचा सर्वांचाच दावा
बुलडाणा जिल्ह्यामध्ये 527 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या असून यातील 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर उर्वरित 498 ग्रामपंचायतीच्या 3 हजार 891 सदस्य निवडीसाठी 15 जानेवारीला मतदान झाले. त्यानंतर सोमवारी 18 जानेवारीला सकाळी दहा वाजल्यापासून बुलडाणा जिल्ह्यातील तेराही तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली होती. पहिले बॅलेट पेपर आणि नंतर ईव्हीएम मशीनमध्ये पडलेले मतमोजणी झाली.
निकालानंतर वर्चस्ववाद-
निवडून आलेल्या विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी विजयी जल्लोष साजरा करीत असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभे असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रत्यक्ष सहभागी न झालेले राजकीय पक्षाचे नेते निवडणुकीच्या काळात मात्र आपल्या सोयीनुसार बाहेरगावी किंवा दौऱ्यावर होते. प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या प्रचार किंवा जाहीर बैठका घेण्याचे त्यांनी टाळले. मात्र निवडणुकीचा निकालानंतर श्रेय घेण्याच्या वर्चस्वाच्या लढाईत ते दिवसभरात कामाला लागले होते.निवडून आलेले सर्व सदस्य हे आमच्याच पक्षाचे असल्याचा दावा करीत आहे. प्रत्येक राजकीय पक्ष नेते 80 ते 90 टक्के आपलेच उमेदवार विजयी झाल्याचा दावा करत आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीत निवडुन असलेले उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या दाव्यांची गोळा बेरीज केली तर निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या तब्बल तीन पटीने वाढेल एवढे मात्र निश्चित.
जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायत
एकूण ग्रामपंचायत - 527
बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत-28
अर्ज न भरलेल्या ग्रामपंचायत-1
निकाल जाहीर झालेले ग्रामपंचायत-498
संभाव्य ग्रामपंचायतमध्ये विजयी उमेदवारांचे पक्ष
काँग्रेस- 147
राष्ट्रवादी- 77
शिवसेना- 129
भाजप- 146
मनसे- 02
स्थानिक आघाडी - 25
निवडणूक झाली नाही - 1
एकूण 527 ग्रामपंचायत निकाल

Last Updated : Jan 19, 2021, 9:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.