बुलडाणा - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेकडून राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा प्रचार करायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. गुरुवारी आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा बुलडाण्यात आली. यावेळी बुलडाण्यातील जनतेने त्यांचे स्वागत भावी मुख्यमंत्री असे केले.
आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरू असून ही यात्रा गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यात आली होती. जिल्ह्यातील शिवसैनिकांनी ठाकरे यांचे यावेळी जोरदार स्वागत केले. यावेळी, भावी मुख्यमंत्री असे दर्शनी फलक लावून ठाकरे यांचा सत्कारही करण्यात आला.
हेही वाचा... आखाडा विधानसभेचा : खामगाव विधानसभेसाठी होणार तिरंगी लढत; वंबआची भूमिका ठरणार परिणामकारक
बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकातील गांधी भवन परिसरात आदित्य यांची सवांद सभा झाली. यानंतर ते चिखली येते जात असताना शहराबाहेरील येळगाव फाट्यावर माजी आमदार विजयराज शिंदेंनी आदित्य ठाकरेंचे स्वागत केले. यावेळी आदित्य ठाकरे यांना राज्याचे भावी मुख्यमंत्री असे संबोधण्यात आले होते. युवक युवतींनी प्लास्टिक वापर बंद करा, वाचवा वसुंधरा, वृक्षांना सजवा सृष्टी मग भरपूर होईल पर्जनवृष्टी, जंगल वाचवा प्रदूषण मुक्त महाराष्ट्र घडवा असे संदेश असलेले फलक वेगवेगळ्या वेशभूषेत हाती घेत ठाकरेंचे आगळेवेगळे स्वागत केले.
हेही वाचा... बुलडाण्यात जन आशीर्वाद यात्रे दरम्यान आदित्य ठाकरेंसमोर शिवसेनेचे दोन गट उघड...
हे सर्व पाहून हा स्वागत सोहळा आहे की, एखादी सभा आहे. असे उद्गार आदित्य ठाकरेंनी काढले.