बुलडाणा - एकात्मिक झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या 371 घरकुल लाभार्थ्यांचे थकीत अनुदान मिळावे. चिखली शहरातील मुख्य चौकात खामगाव चौफुल्ली येथे राजर्षी शाहु महाराजांचा पुतळा उभारावा तसेच शहरातील मुख्य रस्त्याचे काम अंदाज पत्रकानुसार व्हावे, या तीन मागण्यांसाठी चिखली नगर परिषदेसमोर बहुजन समाज पक्षाच्या वतीने 28 नोव्हेंबरपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. जिल्हा प्रभारी प्रशांत डोंगरदिवे यांच्या उपोषणाला घरकुल थकीत अनुदानाच्या लाभार्थ्यांनी पाठिंबा दिला आहे.
एकात्मिक झोपडपट्टी विकास योजने अंतर्गत नगर परिषद चिखलीच्या वतीने सन 2015 आणि सन 2016 या वर्षी राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या 371 घरकुल लाभार्थ्यांना पहिला टप्पा मिळाला. मात्र, पुढील अनुदान मिळाले नाही वारंवार विनंती करूनही अनुदान दिले नाही, हे थकीत अनुदान द्यावे, नगर परिषद इमारतीला राजर्षी शाहु महाराजांचे नाव आहे. मात्र, शहरात पुतळा नाही म्हणून शहरातील मुख्य चौकात खामगाव चौफुल्ली येथे राजर्षी शाहु महाराजांचा पुतळा उभारावा. शहरात रस्त्यासाठी 16 कोटींचा निधी आला असून रस्ते अंदाज पत्रकानुसार होत नाहीत, शहरातील मुख्य रस्ता निकृष्ट दर्जा असून कामाच्या अंदाज पत्रकानुसार रस्ते टिकावू करावे, या तीन मागण्यांसाठी चिखली नगर परिषदेसमोर बहुजन समाज पक्षाच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यांच्या उपोषणाची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने शहरातील सुरू असलेले रस्त्याच्या कामांच्या जागी सगळ्या नागरिकांना पाहता यावे यासाठी रस्त्यांचे अंदाजपत्रकाचे मोठे बॅनर लावण्यात आले आहे.
हेही वाचा - बुलडाणा जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादीचा होणार घटस्फोट? महाविकास आघाडीमुळे नवीन राजकीय समीकरणे