ETV Bharat / state

बेड मिळण्यासाठी कोरोना रुग्णाचे कोविड केंद्राच्या प्रवेशद्वार समोर उपोषण

मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील युवकाला बेड मिळाल्याने त्याने उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड केंद्रासमोर आमरण उपोषण सुरू केले. त्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत या कुटुंबाला दाखल करून घेतले.

buldana corona news
buldana corona news
author img

By

Published : May 3, 2021, 8:41 PM IST

बुलडाणा - जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेकांना बेड मिळणे कठीण झाले आहे. अशातच मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील युवकाला बेड मिळाल्याने त्याने उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड केंद्रासमोर आमरण उपोषण सुरू केले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्याच्यासह परिवारातील चार जणांना रुग्णालयात दाखल करून घेतले.

प्रतिक्रिया

27 एप्रिलरोजी दाताळा येथील एका कुटूंबातील चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला होता. दरम्यान दोघा जणांची ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र ऊमाळी येथून मलकापूर उपजिल्हा रुग्णालय कोविड केंद्रात हलविण्यात आले. मात्र, येथील रुग्णालयात बेड नसल्याने प्रशासनाने खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. परंतू बेड नसल्याचे सांगत रुग्णालय प्रशासनाने त्यांना बाहेर काढले. अखेर या कुटुंबातील एका सदस्याने बेड मिळावा यासाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा समोरच उपोषण सुरू केले. त्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत या कुटुंबाला दाखल करून घेतले.

हेही वाचा - एका रात्रीत लशींचे उत्पादन वाढविणे शक्य नाही- आदर पुनावाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.