ETV Bharat / state

खांमगाव भूखंड घोटाळ्यातील फरार आरोपी प्रदीप राठी अखेर जेरबंद - बनावट मु्द्रांक

बुलडाणा जिल्ह्यातील तेलगी समजला जाणारा प्रदीप राठी याने लवलेश सोनी यांच्या नावे असलेले 14 प्लॉट परस्पर आपल्या नावे केले. ज्यामध्ये प्रदीप राठी यांनी आपल्या घरीच बनावट मुद्रांक तयार केले, अधिकाऱ्यांचे खोटे शिक्के तयार करून स्वतः अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी केल्या आणि या दस्ताऐवजांच्या आधारे अधिकाऱ्यांसोबत आर्थिक व्यवहार करत बनावट खरेदी खत नोंदवून घेतले होते.

accused pradip rathi
आरोपी प्रदीप राठी अखेर जेरबंद
author img

By

Published : Mar 14, 2021, 1:53 PM IST

Updated : Mar 14, 2021, 2:29 PM IST

बुलडाणा - खामगाव येथील बहुचर्चित बनावट मुद्रांक, शिक्के, यासह इतर खोटे दस्तऐवज करून 1 कोटी 64 लाख रुपयांचा भूखंड घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आले होते. तेलगी प्रमाणे मुद्रांक घोटाळा करणारा या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रदीप राठी याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. 12 मार्चला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अकोल्यातून त्याला अटक केली आहे.

फरार आरोपी प्रदीप राठी अखेर जेरबंद

काय आहे प्रकरण-

लवलेश सोनी यांचा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. त्यांनी 14 डिसेंबर 2000 रोजी वल्लभदास राठी यांच्याकडून खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा शिवारातील गट नंबर 24 मधील दहा प्लॉट विकत घेतले होते, नंतर 2007 साली लवलेश सोनी यांचा मृत्यू झाला, त्यानंतर 2007 ते 2021 दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील तेलगी समजला जाणारा प्रदीप राठी याने लवलेश सोनी यांच्या नावे असलेले 14 प्लॉट परस्पर आपल्या नावे केले. ज्यामध्ये प्रदीप राठी यांनी आपल्या घरीच बनावट मुद्रांक तयार केले, अधिकाऱ्यांचे खोटे शिक्के तयार करून स्वतः अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी केल्या आणि या दस्ताऐवजांच्या आधारे अधिकाऱ्यांसोबत आर्थिक व्यवहार करत बनावट खरेदी खत नोंदवून घेतले होते. तसेच हे सर्व 1 कोटी 64 लाख रुपयांचे प्लॉट दुसऱ्या व्यक्तीला विकण्यात आले.

लवलेश सोनी यांच्या मृत्यू नंतर 2021 मध्ये त्यांच्या पत्नीने प्लॉट संदर्भात चौकशी केली असता, हे सर्व प्लॉट प्रदीप राठी यांनी बनावट दस्तऐवज तयार करून परस्पर नावावर केल्याची माहिती समोर आली. त्यावरून 25 जानेवारीला लवलेश सोनी यांच्या पत्नीने खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण मूळ कागदपत्रे देऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले. पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून प्रदिप राठीने व्यवहार केलेले दस्तऐवज बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी प्रदीप राठी यांच्यावर गुन्हा दाखल केला.

घोटाळ्या प्रकरणी गुन्हे दाखल, मात्र फरार होता आरोपी

या प्रकरणात तब्बल 1 कोटी 64 लाख रुपयांच्या घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी प्रदीप राठी यांच्यावर गुन्हा दाखल करत प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले. मात्र आरोपी प्रदीप राठी हा गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता. दरम्यान त्याने खामगाव येथील जिल्हा सत्र न्यायालय व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देखील त्याचा अंतरिम जामीन फेटाळला होता.

अकोला येथून प्रदीप राठीला केले अटक-

प्रदीप राठीचा पोलीस शोध घेत असताना, हा आरोपी अकोला येथे नातेवाईकांच्या घरी लपलेला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांना तत्काळ कारवाई करत त्याला अकोल्यातून अटक केली. त्यानंतर त्याला बुलडाणा येथे आणून त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. शनिवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास राठीला खामगाव येथे नेण्यात आले. दरम्यान या घोटाळ्यात 1 कोटी 64 लाख रुपयांपेक्षा जास्त घोाटाळा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

बुलडाण्याचा तेलगी प्रदीप राठी-

मुद्रांक घोटाळा प्रकरणी प्रदीप राठी हा बुलडाणा जिल्ह्यातील तेलगी असल्याच्या चर्चा सुरू असून याच्या विरोधात अजूनही काही भूखंड घोटाळ्याची प्रकरणे दाखल होणार असल्याची चर्चा होत आहे. तसेच पोलीस तपासात त्याने केलेले आणखी काही आर्थिक घोटाळे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Last Updated : Mar 14, 2021, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.