ETV Bharat / state

बुलडाणाच्या मेहकरमध्ये भर रस्त्यावर महिलेने दिला बाळाला जन्म, दोघेही सुखरुप - मेहकर बातमी

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे एका महिलेची भर चौकात प्रसूती झाली. नागरिकांनी वेळीच महिला व तिच्या बाळाला रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात दाखल असलेली महिला
रुग्णालयात दाखल असलेली महिला
author img

By

Published : Feb 27, 2021, 4:20 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील मेहकर येथे एका महिलेची भर चौकात प्रसूती झाल्याची घटना गुरुवारी (दि. 25) दुपारी घटली. नागरिकांनी तत्काळ महिलेला व तिच्या गोंडस मुलीला रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती स्थिर आहे.

महेकर येथील सुरेखा शिंदे ही गर्भवती महिला जिजाऊ चौकातून आपल्या घराकडे पायी जात होती. त्यावेळी अचानक त्या महिलेला प्रसव कळा सुरू झाल्या. मदतीसाठी इतर महिला येण्यापूर्वीच तिची प्रसुती झाली व तिने एका गोंडस मुलीचा जन्म दिला. त्यानंतर प्रवीण पऱ्हाड नामक व्यक्तीने त्यांना रिक्षातून शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या महिला व बाळ दोन्ही सुखरुप असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा - बुलडाण्यात टाळेबंदीच्या आदेशाला व्यापारी संघटनेचा विरोध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.