बुलडाणा- संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशातही कोरोना विषाणूने आपली मुळे मजबूत करायला सुरुवात केली आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ९०० च्या पार गेला आहे. त्यामुळे, भीतीपोटी जिल्ह्यातून परजिल्ह्यात गेलेले हजारो नागरिक परतीची वाट धरत आहे. शासकीय आकडेवारीनुसार राज्यातील विविध जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात आलेल्यांची संख्या ३८ हजार ७७९ असल्याचे समजले आहे.
शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक कामाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विकसित जिल्ह्यांची वाट धरतात. मात्र, जेव्हापासून राज्यात कोरोनाने आपले पाय पसरविण्यास सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात शहरी भागात कोरोनाचे रुग्ण आढळले, त्यानंतर स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी आपल्या गावाकडली वाट धरली आहे. शासकीय आकड्यानुसार जिल्ह्यात परत आलेल्यांची संख्या ३८ हजार ७७९ इतकी आहे. या पैकी ३६ हजार २८२ नागरिकांची तपासणी झाली असून १० हजार ३६३ नागरिकांच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का मारण्यात आला आहे.
हेही वाचा- 'लॉक डाऊन'मध्ये तरुणांकडून उपेक्षितांना दोन वेळचे अन्नदान..