ETV Bharat / state

महाराजांना अभिप्रेत रयतेचं राज्य महाविकास आघाडी निर्माण करेन - पालकमंत्री डॉ. शिंगणे - बुलडाणा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्याचे परिपत्रक काढले आहे. त्यानिमित्ताने रविवारी बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आवारात अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते गुढी उभारून हा सोहळा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. तांब्याचा कळस, राजमुद्रा असलेला झेंडा, भगवी पताका आणि त्यांना आंब्याच्या पानाचे तोरण बांधून ही गुढी उभारण्यात आली होती.

348th Shivrajyabhishek day celebration in Buldana
बुलडाण्यात पालकमंत्री डॉ.शिंगणे उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा
author img

By

Published : Jun 6, 2021, 2:01 PM IST

बुलडाणा - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यातील रयतेचे राज्य ज्या पद्धतीने सुरू होते. त्याचपद्धतीने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे काम सुरू आहे. सतत महाराष्ट्रावर कोणता ना कोणता संकट येत आहे. अतिवृष्टीच संकट आहे, वादळच संकट आहे, महामारीच संकट आहे. आणि या संकटातून आपली अर्थव्यवस्था सावरत असतांना आपण महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेले रयतेचं राज्य महाराष्ट्रात निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. असे जिल्हा परिषदेच्या आवारात अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते गुढी उभारून हा सोहळा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

बुलडाण्यात पालकमंत्री डॉ.शिंगणे उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा

तोरण बांधून उभारली गुढी -

राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्याचे परिपत्रक काढले आहे. त्यानिमित्ताने रविवारी बुलडाणा जिल्ह्यातही शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. तांब्याचा कळस, राजमुद्रा असलेला झेंडा, भगवी पताका आणि त्यांना आंब्याच्या पानाचे तोरण बांधून ही गुढी उभारण्यात आली होती. तर गुढीच्या पायथ्याशी आकर्षक अशी फुलांची सजावट आणि आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई जालींदर बुधवत, मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते. शिवाय बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयावर सुद्धा गुढी उभारण्यात येऊन शिवराज्याभिषेक दिन साजरा केला गेला.

राज्याचे देशात सर्वात पारदर्शक काम -

कोरोना सारख्या संकटातून बाहेर पडण्याचे काम राज्य सरकारकर्ते महाराष्ट्रामध्ये उत्तम आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याचे काम केला जात आहे. देशात सर्वात पारदर्शक काम कोरोनाच्या काळात राज्य सरकार करत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - किल्ले रायगडावर 348 वा शिवराज्यभिषक सोहळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.