भंडारा : पवनी तालुक्यात वाघाच्या कातडीसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. भंडारा आणि नागपूर येथील वनविभागाने संयुक्त कारवाई करीत या दोन तस्करांना पकडले आहे. निलेश सुधाकर गुजराथी राहणार चंद्रपूर ( वय 33), विकास बाथोली बाथो राहणार चंद्रपूर ( वय 31) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही तस्करांचा संबंध आंतरराष्ट्रीय तस्करांशी असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यांच्या अटकेनंतर अजूनही काही लोकांना अटक केल्या जाण्याची शक्यता आहे.
कातडी केली तस्करी : मागील काही महिन्यात नागपूर वनविभागाला गूप्त माहिती मिळाली की, भंडारा येथे वाघाच्या कातडीची तस्करी होणार आहे. वनविभागाने या आरोपींवर पाळत ठेवली होती. बुधवारी नागपूर वनविभागास प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे, विशेष पथक तयार करुन भंडारा विभागाच्या पथकासह संयुक्त कारवाई करुन वाघाच्या कातडीसह या दोन आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपी विरुद्ध वनगुन्हा : आरोपी निलेश सुधाकर गुजराथी आणि विकास बाथोली बाथो याना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या कडून वाघाची कातडी 1 नग, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या विविध कलमाद्वारे वनगुन्हा नोंदविण्यात येणार आहे.
कातडी विक्रीसाठी : मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले दोघे आरोपी चंद्रपूर, भंडारा, नागपूर क्षेत्रातील वन्य प्राण्यांची शिकार करतात. ज्या वाघाची कातडी आज मिळाली तो वाघ चंद्रपूर येथील होता. त्याची शिकार करून त्याची कातडी विक्रीसाठी या तस्करांनी भंडारा जिल्ह्याचे पवनी क्षेत्र निवडले होते. या आरोपींचा संबंध आंतरराष्ट्रीय शिकारी टोळीशी असावा अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
यांनी केली कारवाई : यांच्या अटकेनंतर अजूनही काही शिकारी आणि वन्य जीव तस्करांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. यांच्या मध्यामतून बरेच गुन्हे सुद्धा बाहेर येण्याची शक्यता आहे. सदर सापळा पवनी वनपरिक्षेत्र, भंडारा वन विभाग भंडारा येथे रचण्यात आला. सदर कारवाई मुख्य वनसंरक्षक नागपूर रमेश कुमार, भारत सिंह हांडा, उपवसंरक्षक, राहुल गवई, भावसे, उपवनसंरक्षक, भंडारा यांना केली.
हेही वाचा -