भंडारा - जिल्ह्यातील अड्याळ वनपरीक्षेत्रातील विहिरीत पडून दोन बिबट मृत पावल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. पवनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या अड्याळ वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कलेवाडा या गावात असलेल्या सदानंद घोगरे यांच्या शिवारातील विहिरीत हे दोन बिबटे पडले होते. कुजलेल्या अवस्थेत होते. अड्याळ वनविभागाला जंगलालगत असलेल्या एका शेतात ते पडले असल्याची माहिती मिळाली. याविषयीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वरिष्ठ अधिकारी टीम आणि डॉक्टरांसह घटनास्थळी पोहोचले. वयस्क नर बिबटे आहेत.
विहिरीत आढळून आले दोन्ही बिबटे
हे नर बिबटे असून एकाचे वय 3 ते 4 वर्ष व दुसरा बिबट्या हा 7 ते 8 वयोगटातील असल्याच्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सदर परिसर हा जंगलव्याप्त भागालगत असल्यामुळे येथे वन्यप्राण्यांचा वावर असतो. शेतातील विहिरीचे कठडे उंच नसल्याने तसेच शेताभोवती मोठ्या प्रमाणात गवत असल्याने ते विहिरीत पडले असल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविला जात आहे.
जुनी घटना
बिबट्यांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते कुजलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे अशी घटना जवळपास तीन ते चार दिवसांपूर्वी झाली असावी, असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे.