ETV Bharat / state

तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन वाघांच्या बछड्यांचा अन् एका अस्वलाचा मृत्यू - भंडारा जिल्हा बातमी

भंडारा जिल्ह्यात तीन विविध घटनेत वाघांच्या तीन बछड्यांचा व एका अस्वलाचा मृत्यू झाला आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : May 12, 2021, 3:44 PM IST

Updated : May 12, 2021, 7:27 PM IST

भंडारा - जिल्ह्यत तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाघांच्या तीन बछड्यांचा आणि एका अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भंडारा तालुक्यातील गराडा बु. गावातील तलावाजवळ असलेल्या टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्याच्या सायफन टाक्यात दोन वाघाची बछडे मृतावस्थेत मिळून आली.

माहिती देताना जिल्हा मानद वन्यजीव रक्षक

या बछड्यांचा मृत्यू विहिरीत बुडल्याने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर दुसरी घटना ही पाहुणी तालुक्यातील असून तिथेही एका वाघाच्या बछड्यांचा मृतदेह आढळून आला आहे. तर भंडारा तालुक्यातील दवडीपार जवळ एका अस्वलाचे मृतदेह आढळून आले आहे.

जवळच आढळले वाघिणीच्या पंजाचे ठसे

भंडारा तालुक्यातील टेकेपार उपसा सिंचन जवळ गावातील काही तरुण पोलीस व सैन्य भरतीची तयारी करण्यासाठी नेहमीप्रमाणे पहाटे धावण्याच्या सरावासाठी गेले होते. या युवकांना वाघांचे दोन बछडे विहिरीत मृतावस्थेत दिसून आले. त्या युवकांनी याची माहिती वन विभागाला दिली. माहिती मिळताच वनक्षेत्र अधिकारी वाजुरकर, उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, जिल्हा मानद वन्यजीव रक्षक नदीम खान व शाहीद खान घटनास्थळी पोहोचून मृत दोन बछड्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. जवळच वाघिणीच्या पंजाचे ठसे दिसले. त्यामुळे या दोन्ही बछड्यांची आई जवळच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

खेळता-खेळता बछडे विहिरीत पडल्याचा अंदाज

कॅनॉलच्या सखल भागात पाणी साठण्यासाठी कॅनॉलच्या खालच्या भागात सायफन विहिरी बनविल्या जातात. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुले या विहिरीत पाणी साचले असेल. खेळता-खेळता ही बछडे त्या विहिरीत पडली असतील वाघिणीने बछड्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असेल मात्र, ती वाचवू शकली नसेल, असा अंदाज जिल्हा मानद वन्यजीव रक्षक नदीम खान यांनी व्यक्त केला आहे.

पवनी आढळला तिसरा वाघाचा बछडा

पवनी वनक्षेत्रात एका वाघिनेने दोन दिवसांपूर्वी आपल्या एका बछड्याला सोडून दिले होते. वन विभागाच्या पथकाने त्या बछड्याला दूध पाजून पुन्हा त्याच ठिकाणी ठेवले होते. ती वाघीण परत येऊन या बछड्याला घेऊन जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आज तो बछडा त्याच ठिकाणी मृतावस्थेत आढळूला आहे.

अस्वल मृत अवस्थेत आढळली

भंडारा वन विभागांतर्गत दवडीपार राउंडच्या कक्ष क्रमांक 286 मध्ये एका नर अस्वलाचे मृतदेह आढळून आले. बीट गार्ड फुलसुंगे हे गस्तीवर असतांना त्यांना हे नर अस्वल एका रपट्याच्या बाजूला मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी विजय राजूरकर यांना माहिती दिल्यानंतर विभागीय वन अधिकारी एस.बी. भलावी व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळले नसून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - शहरातील कॅनरा बँकेला आग; आगीचे कारण अस्प्षट

Last Updated : May 12, 2021, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.