ETV Bharat / state

अयोध्या, वैष्णोदेवी दर्शनासाठी भंडाऱ्यातून 'विशेष पर्यटन रेल्वे'

author img

By

Published : Feb 6, 2021, 5:58 PM IST

कोरोना काळातील मानसिक तणाव कमी व्हावा, या दृष्टीने अत्यंत माफक दरात पर्यटन घडवण्याचा प्रयत्न रेल्वे विभागातर्फे करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 31 मार्च 2019 रोजी इतवारी रेल्वे स्थानकावरून ही पर्यटन ट्रेन सोडली जाणार आहे. या गाडीच्या माध्यमातून काशी विश्वनाथ, प्रयागराज, अयोध्या, वैष्णोदेवी या प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घडविले जाणार आहे. प्रतिव्यक्ती 9 हजार 30 रुपये शयनयान कक्षासाठी तर 10 हजार 920 रुपये वातानुकूलितसाठी खर्च येणार आहे.

नऊ हजारांत अयोध्या, वैष्णोदेवी दर्शन
नऊ हजारांत अयोध्या, वैष्णोदेवी दर्शन

भंडारा - कोरोना कार्यकाळात भारतीय रेल्वे बंद होती. त्याचा आर्थिक फटकाही त्यांना सहन करावा लागला. तसेच, या काळात लोकांनाही घरी बसून कंटाळा आला आहे. नागरिकांना या कोरोनाच्या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी भारतीय रेल्वेच्या केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने अगदी कमी दरात अयोध्या आणि वैष्णोदेवीची यात्रा घडविण्यासाठी स्पेशल ट्रेन 31 मार्च रोजी सुरू केली जाणार आहे. त्यासाठी बुकिंग सुरू झाल्याची माहिती क्षेत्रीय प्रबंधक सोरेन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

अयोध्या, वैष्णोदेवी दर्शनासाठी भंडाऱ्यातून 'विशेष पर्यटन रेल्वे'
31 मार्चला नागपूरच्या इतवारी पासून सुरू होईल यात्रा

भंडारा रोड रेल्वे स्थानक येथे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांची ओळख व्हावी. तसेच, कोरोना काळातील मानसिक तणाव कमी व्हावा, या दृष्टीने अत्यंत माफक दरात पर्यटन घडवून आणण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 31 मार्च 2019 रोजी इतवारी रेल्वे स्थानकावरून ही पर्यटन ट्रेन सोडली जाणार आहे. या गाडीच्या माध्यमातून काशी विश्वनाथ, प्रयागराज, अयोध्या, वैष्णोदेवी अशा प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घडविले जाणार आहे.

हेही वाचा - महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे हिंगोलीत उत्पादन; नोकरी सोडून युवकाने केला यशस्वी प्रयोग

केवळ 900 रुपये प्रति दिवस खर्च

आठशे प्रवाशांची क्षमता असलेल्या या गाडीत एक वातानुकूलित डबा असून पंधरा शयनयान कक्षाचे डबे आहेत. गरज पडल्यास वातानुकूलित डबा वाढविला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा आठ दिवसांचा प्रवास असून प्रतिदिवस केवळ 900 रुपये एवढा खर्च येणार आहे. प्रतिव्यक्ती 9 हजार 30 रुपये शयनयान कक्षासाठी तर 10 हजार 920 रुपये वातानुकूलितसाठी खर्च येणार आहे.

कोरोनाच्या दृष्टीने उपाययोजना

या 9 हजार 30 रुपयांमध्ये प्रवासाला निवासाची व्यवस्था, शाकाहारी भोजन, वाहनांद्वारे दर्शन स्थळापर्यंत जाण्याची व्यवस्था, प्रवाशांचा विमा इत्यादी गोष्टी दिले जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दररोज मास्क आणि सॅनिटायझर यांची किटही दिली जाणार आहे.

या स्थानकावरून जाणार गाडी

31 मार्च 2021 नागपूर इतवारी रेल्वे स्थानकापासून ही ट्रेन सुरू होणार असून भंडारा रोड, गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, कटनी या स्थानकावरून प्रवाशांना घेऊन यात्रेसाठी निघणार आहे. या प्रवासात वैद्यकीय सुविधाची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 31 मार्चला सुरू होणारी ही यात्रा 8 एप्रिलपर्यंत राहणार आहे. या गाडीसाठी आरक्षण करायचे असल्यास 7670908323 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा - नागपूर शहरातील पोलिसांच्या लसीकरणाला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.