ETV Bharat / technology

18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना पेन्शन, घरबसल्या मिळणार 6 हजार रुपये मासिक - PMKMY - PMKMY

Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana : प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PMKMY) ही एक सरकारी योजना आहे. या योजनेचा उद्देश लहान तसंच अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात सुरक्षा प्रदान करणं आहे. 12 सप्टेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली, ही ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 1, 2024, 7:01 AM IST

हैदराबाद Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana : प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PMKMY) ही लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर 6 हजार रुपये मासिक पेन्शन मिळतं. योजनेचा लाभ घेण्यासाठी, शेतकऱ्यांना ठराविक रक्कम द्यावी लागतं, जी त्यांच्या वयानुसार बदलतं. या योजनेसाठी अर्ज करण्याची कसा करायचा?, योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पत्रता लागते? चला जाणून घेऊया...

पात्रता :

  • वय मर्यादा : 18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • जमीन मर्यादा : अर्जदाराकडं 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असावी.
  • इतर योजनांचा लाभ : अर्जदार इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा.

अर्ज प्रक्रिया : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अर्ज करणं अगदी सोपं आहे. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीनं या योजनेसाठी अर्ज करू शकता. येथे आपण दोन्ही प्रक्रियांची माहिती घेऊया...

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट द्या. तुम्हाला या योजनेसाठी CSC केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा मिळते. केंद्रांबद्दल माहितीसाठी, तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

आवश्यक कागदपत्रे सबमिट करा :

तुम्हाला खालील कागदपत्रे CSC वर सबमिट करावी लागतील:

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • जमिनीची कागदपत्रे
  • मोबाईल नंबर

योजनेत नोंदणी करा : तुमच्या कागदपत्रांमधील माहितीच्या आधारे CSC ऑपरेटर तुमची ऑनलाइन नोंदणी करेल. यामध्ये तुमची बँकिंग माहिती आणि आधार योजनेशी लिंक केली जाईल.

मासिक रक्कम निश्चित करणे : योजनेसाठी मासिक रक्कम तुमच्या वयानुसार निश्चित केली जाईल. वयाच्या 18 व्या वर्षी प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांना अंदाजे 55 रुपये मासिक द्यावे लागतील, तर वयाच्या 40 व्या वर्षी प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांना अंदाजे 200 रुपये मासिक हप्ता द्यावा लागेल.

प्रमाणपत्र मिळवा : नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला CSC केंद्राकडून पेन्शन योजना प्रमाणपत्र (पेन्शन कार्ड) मिळेल, ज्यामध्ये तुमची रक्कम आणि पेन्शनबद्दल माहिती असेल.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया : जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी. ऑफलाइन प्रक्रियेसाठीही, तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट द्यावी लागेल. तेथे ऑपरेटर तुम्हाला मदत करेल.

फॉर्म भरा : योजनेसाठी एक अर्ज CSC केंद्रावर उपलब्ध असेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. यामध्ये आधार क्रमांक, बँक खाते तपशील तसंच जमिनीची माहिती समाविष्ट आहे.

फॉर्म सबमिट करा आणि पेमेंट करा : फॉर्म योग्यरित्या भरल्यानंतर सबमिट करा. तसंच योजनेमचं शुल्क भरा. यानंतर CSC ऑपरेटर योजनेत तुमच्या नावाच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करेल.

  • योजनेचे मुख्य मुद्दे : शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना 3 हजार रुपये मासिक पेन्शन मिळतं.
  • मासिक योगदान : शेतकऱ्याच्या वयानुसार, त्यांना ठराविक मासिक रक्कम द्यावी लागते.
  • सुरक्षा : नोंदणीकृत शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या पत्नीला पेन्शनच्या निम्मी रक्कम (1 हजार 500 रु) मिळेल.
  • स्वैच्छिक योजना : ही योजना पूर्णपणे ऐच्छिक आहे. शेतकरी ती कधीही सोडू शकतात.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करते आणि त्यांचं जीवनमान सुधारण्यास मदत करते. अर्ज प्रक्रिया सोपी आणि सोयीस्कर आहे, ज्यामुळं शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळतं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.