लखनऊ Irani Cup 2024 Live Streaming : रणजी करंडक विजेते मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात इराणी चषक 2024 (Irani Cup 2024 Mumbai vs Rest of India) अटल बिहारी बाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ इथं खेळला जाईल. रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईनं 42व्यांदा रणजी करंडक जिंकला. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा हा भारतीय दिग्गज मुंबई संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. तर रेस्ट ऑफ इंडियाची कमान ऋतुराज गायकवाडच्या हाती आहे. (Irani Cup 2024 LIVE STREAM)
The #IraniCup 2024 starts tomorrow 🙌
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 30, 2024
The 2023-24 #RanjiTrophy champions Mumbai take on the Rest of India
Which team are you rooting for 🤔
📍 Lucknow
📺 JioCinema
💻📱 https://t.co/pQRlXkCguc@IDFCFIRSTBank | @MumbaiCricAssoc pic.twitter.com/f1VEFBnwbK
- इराणी चषक 2024 : मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील सामना कधी खेळला जाईल?
मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील इराणी चषकाचा हा सामना 1 ऑक्टोबरपासून म्हणजेच मंगळवारपासून खेळवला जाणार आहे.
- इराणी चषक 2024 : मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील सामना कुठं खेळला जाईल?
हा इराणी चषक सामना मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळवला जाईल.
- इराणी चषक 2024: मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील सामना कधी सुरू होईल?
मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील इराणी चषकाचा हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता खेळला जाईल. या सामन्याचा नाणेफेक सकाळी 8.30 वाजता होणार आहे.
- इराणी चषक 2024 : मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?
स्पोर्ट्स 18 नेटवर्ककडे मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील इराणी चषक सामना प्रसारण करण्याचे अधिकार आहेत. स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या विविध चॅनेलवर तुम्ही हिंदी आणि इंग्रजी तसंच देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह हा सामना पाहू शकता.
- इराणी चषक 2024 : मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया फोन किंवा लॅपटॉपवर सामना कसा पाहायचा?
मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील इराणी चषक सामन्याचं जिओ सिनेमा ॲपवर लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.
- इराणी चषक 2024: मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया विनामूल्य थेट सामना कसा पाहायचा?
मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील इराणी चषक सामना जिओ सिनेमा ॲपवर प्रसारित केला जात आहे. तसंच तुम्ही तुमच्या फोनवर सोनी लीव्ह ॲप इन्स्टॉल करून सामना फ्रीमध्ये पाहू शकता.
इराणी चषकसाठी दोन्ही संघ :
रेस्ट ऑफ इंडिया : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इसवरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शान किशन (यष्टीरक्षक), मानव सुथार, सरांश जैन, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल , रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर.
मुंबई संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), सिद्धांत अधातराव (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, तनुष कोटियान, हिमांश कोटियान, हिमांशू सिंह, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनैद खान आणि रॉयस्टन डायस
हेही वाचा :