ETV Bharat / politics

"निवडणुकीवेळी गाईला वंदा, निवडणुकीनंतर गाईच्या गळ्यात फंदा", विजय वडेट्टीवारांची भाजपावर बोचरी टीका - Vijay Wadettiwar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Vijay Wadettiwar On State Government : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची खोचक प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घ्या, सविस्तर प्रतिक्रिया

Vijay Wadettiwar criticized state govt over decision to declare desi cows as Rajyamata Gomata
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (ETV Bharat)

मुंबई Vijay Wadettiwar On State Government : "विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार राज्यातील जनतेला खुश करण्याच्या दृष्टीकोनातून मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेत आहे. तर दुसऱ्याबाजूला राज्यात दुष्काळ परिस्थिती असून पशुधनाला साधा चारा देण्याची व्यवस्था सरकार करू शकलं नाही. मात्र, गायींना राज्यमातेचा दर्जा देऊन महायुती सरकार काय साध्य करणार? राजकारण भाजपासाठी धंदा आहे. निवडणुकीवेळी गायींना वंदन करणार आणि निवडणूकनंतर गायींच्या गळ्यात फंदा असणार," असे म्हणत कॉंग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय.

निवडणुकीमुळं लाडक्या गायींची आठवण : "सध्या राज्यात दुष्काळ परिस्थिती असतांना सरकारकडून पशुधनाला चारा उपलब्ध केला जात नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला बोनस देणारी घोषणा पूर्ण झालेली नाही. मात्र, निवडणूक तोंडावर आल्यानं सरकारला लाडक्या गायीची आठवण झाली,"असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. "पशुधन सांभाळण्याची जबादारी सरकारनं झटकली. दुष्काळ काळात चारा आणि पाणी विना तडफणाऱ्या गायी आठवल्या नाहीत. तसंच महिलांवरील होणाऱ्या अत्याचारावेळी माय आठवत नाही. शेतकरी संकटात असतात तेव्हा भाव आठवत नाही. गायीचं मांस निर्यात करणाऱ्यांकडून चंदा घेतांना गाय आठवत नाही. मात्र, निवडणूक तोंडावर येताच गायीला 'राज्यमाता‘ घोषित केलं. पण हा जुमला सुद्धा निवडणुकीत चालणार नाही," असंही वडेट्टीवार म्हणाले.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)
  • विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात योजना जाहीर करून निधीवाटप केले जात आहे. तर दुसरीकडं विरोधकांकडून विविध मुद्द्यांवर घेरले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेसकडून तयारी सुरू आहे.

कॉंग्रेस घेणार विभागवार इच्छुकांच्या मुलाखती : लवकरच विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 1 ऑक्टोबर ते 8 ॲाक्टोबर दरम्यान घेण्यात येतील. त्यानंतर 10 ॲाक्टोबरपर्यंत आपला गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करतील, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रशासन नाना गावंडे यांनी दिलीय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडं 1688 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिले आहेत.

कोणाकडं कोणती जबाबदारी : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडं पुणे शहर आणि पुणे ग्रामीण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्याकडं नागपूर शहर आणि ग्रामीण, खा. चंद्रकांत हंडोरे यांच्याकडं ठाणे जिल्हा, खा. प्रणिती शिंदे यांच्याकडं सांगली आणि सातारा जिल्हा, मुजफ्फर हुसेन यांच्याकडं अहमदनगर, कुणाल पाटील यांच्याकडं नाशिक, माजी मंत्री विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडं मुंबई शहर, आमदार अमित देशमुख यांच्याकडं सोलापूर आणि कोल्हापूर जबाबदारी आहे. डॉ. नितीन राऊत यांच्याकडं वर्धा आणि यवतमाळ, यशोमती ठाकूर यांच्याकडं परभणी आणि हिंगोली, डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडं नांदेड, वसंत पुरके यांच्याकडं अकोला, खासदार नामदेव किरसान यांच्याकडं वाशीम, खासदार डॉ. कल्याण काळे यांच्याकडं लातूर आणि बीड, खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडं जालना, आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे मुंबई उपनगराची काँग्रेसकडून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डॉ. वजाहत मिर्झा यांच्याकडं छत्रपती संभाजीनगर, एम.एम. शेख यांच्याकडं धाराशिव, हुसेन दलवाई यांच्याकडं पालघर, शिवाजीराव मोघे यांच्याकडं धुळे आणि नंदुरबार, सुरेश शेट्टी यांच्याकडं सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जबाबदारी सोपविलेली आहे. आमदार अभिजीत वंजारी चंद्रपूर आणि गडचिरोली, सतीश चतुर्वेदी यांच्याकडं भंडारा आणि गोंदिया, प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन नाना गावंडे यांच्याकडं बुलढाणा आणि अमरावतीची जबाबदारी आहे.

हेही वाचा -

  1. "राज्यातील शाळासुद्धा अदानींकडं"; विरोधक म्हणाले, "महाराष्ट्राचा सातबारा..." - Vijay Wadettiwar
  2. आरोग्य खात्याचा 3 हजार 200 कोटींचा महाघोटाळा, विजय वडेट्टीवार यांचा सनसनाटी आरोप - Vijay Wadettiwar Allegation
  3. मुख्यमंत्री कार्यालयाच्या आशीर्वादानं विकासकाच्या घशात घातले 400 कोटी, विजय वडेट्टीवारांचा आरोप - Vijay Wadettiwar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.