ETV Bharat / entertainment

सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत चेन्नईतील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर - Rajinikanth Admitted to Hospital

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Updated : 2 hours ago

Rajinikanth Admitted to Hospital : सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड यांना सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अपोलो रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.

Rajinikanth Admitted to Hospital
सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत (ETV Bharat)

चेन्नई Rajinikanth Admitted to Hospital : सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे रजनीकांत यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र रजनीकांत यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. रजनीकांत यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोटात दुखत असल्यानं दाखल केलं रुग्णालयात : सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना पोटात दुखत असल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना सोमवारी रात्री चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती अपोलो रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे. चेन्नई पोलिसांनी वृत्तसंस्थेला बोलताना रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, "सोमवारी रात्री उशीरा अभिनेते रजनीकांत यांना पोटदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना तत्काळ चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या अपोलो रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे."

आज करण्यात येणार तपासणी : रजनीकांत यांना पोटदुखीचा त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यांची आज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रजनीकांत हे लोकेश कनगराजच्या कुली या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना त्यांना त्रास जाणवल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रजनीकांत यांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार : सुपरस्टार रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत आपला मोठा दबदबा निर्माण केला. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीकडं आपला मोर्चा वळवला. आपल्या जोरदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी चित्रपटसृष्टीत आपलं अनभिषिक्त साम्राज्य उभं केलं. त्यांच्या उत्कृष्ठ अभिनयामुळे त्यांना 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण सन्मान देऊन गौरव केला. इतकंच नाही, तर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना आयकॉन ऑफ ग्लोबल ज्युबिली पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सरकारनं त्यांचा 2021 मध्ये सन्मान केला.

हेही वाचा :

  1. Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत मुंबई विमानतळावर स्पॉट; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव...
  2. अभिनेता रजनीकांत रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थीर असल्याची कुटुंबीयांची माहिती
  3. सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; चेन्नईकडे रवाना

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.