ETV Bharat / state

१५ घरफोड्या करणाऱ्या ४ तरुणांसह एका अल्पवयीनाला पोलिसांनी केली अटक

author img

By

Published : Feb 4, 2021, 7:55 PM IST

केवळ मौजमजा करण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या 5 जणांना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. यापैकी एक विधिसंघर्ष बालक आहे. या ५ जणांनी 2019-20 या दोन वर्षात तब्बल 15 ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या.

5 youths arrested Bhandara
५ तरुण अटक भंडारा

भंडारा - केवळ मौजमजा करण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या 5 जणांना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. यापैकी एक विधिसंघर्ष बालक आहे. या ५ जणांनी 2019-20 या दोन वर्षात तब्बल 15 ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या. त्यांनी चोरी केलेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत ३ लाख 57 हजार ४०० रुपये इतकी आहे.

माहिती देताना भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव

हेही वाचा - लागोपाठ दुसऱ्यांदा कुक्कुटपालन व्यवसायिक आर्थिक संकटात

सर्व चोरटे भंडारा शहरात राहणारे

भंडारा शहरातील काही तरुण शिक्षण घेत असताना अमाप पैसा खर्च करत पार्ट्या करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली तेव्हा त्याने त्याच्या सर्व सहकारी मित्रांची नावे सांगितली. त्यावरून पोलिसांनी निहाल अण्णाजी राऊत (वय 23 रा. राजेन्द्र वार्ड), नंदू सहदेव बागळकर (वय 23 रा. शुक्रवारी वार्ड), भारत रामदास देशकर (वय 34 रा. भगतसिंग वार्ड टाकळी), वैभव सुनील बनकर (वय 24 रा. आंबेडकर वार्ड) यांना अटक केली. हे सर्व भंडारा जिल्ह्यात राहतात.

दिवसभर फिरून बंद घरांची रेकी करायचे

हे तरुण कॉलेजमध्ये जातो असे सांगून शहरात किंवा जिल्ह्यात विविध ठिकाणी कुलूप लागलेले घर शोधत होते. कधी दिवसा, तर कधी रात्रीला हे तरुण कुलूप तोडून घरात मिळेल ती वस्तू चोरून नेत होते. कधी नगदी रक्कम, तर कधी टीव्ही, होम थिएटर, तर कधी सोने आणि चांदीची चोरी करायचे.

आठ पोलीस स्टेशन अंतर्गत चोऱ्या

तरुणांनी पहिली चोरी ही 30 जानेवारी 2019 ला आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कान्हळगाव येथे केली होती. भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत चार, मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत 2, आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत 2, कारंजा पोलीस स्टेशन अंतर्गत 2, सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत 1, लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत दोन, तर पालांदूर आणि तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येकी एक, अशा 15 ठिकाणी घरफोड्या केल्या. या सर्व तरुणांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून पंधरा घरफोड्या मधील 135 ग्राम सोने, 325 ग्राम चांदी, एक चांदीची मूर्ती, एक बजाज कंपनीचा एलईडी टीव्ही, होम थिएटर, असा एकूण 3 लाख 57 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हेही वाचा - वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्लाप्रकरणी भंडाऱ्यात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.