ETV Bharat / state

चारचाकी चोराजवळ आढळले, देसी कट्टा अन् जिवंत काडतूस; २ वाहन जप्त

चोरी गेलेली चारचाकी गाडीचा शोध पोलिसांनी सुरू केला होता. या शोधात पोलिसाला या प्रकरणातील आरोपीकडे देशी कट्टा तसेच सहा जिवंत काडतूस आढळली. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

author img

By

Published : Feb 14, 2019, 7:21 PM IST

पोलीस

भंडारा - शहरातून चोरी गेलेली चारचाकी गाडीचा शोध पोलिसांनी सुरू केला होता. या शोधात पोलिसाला या प्रकरणातील आरोपीकडे देशी कट्टा तसेच सहा जिवंत काडतूस आढळली. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी या आरोपीकडून २ चोरीचे वाहनही जप्त केले आहेत. सर्दूल सिंह उर्फ बलविंदर सिंग संधू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

भंडारा येथील संत कबीर वार्डातील रहिवासी गुणवंत तिडके याचे पिकअप मालवाहू वाहन आहे. त्यांचा चालक सुनील कुरंजेकर हा चारचाकी गाडी शहरातील बालाजी पेट्रोल पंपासमोर नेहमीप्रमाणे १५ जानेवारीला उभी करुन निघून गेला. त्या रात्रीला अज्ञात चोरांनी ती गाडी चोरून नेली. वाहन चोरी गेल्याचे लक्षात येताच गुणवंत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी तपास सुरू करून त्या क्षेत्रातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तेव्हा गाडी चोर एका गाडीतून येऊन ती गाडी चोरून नेल्याचे आढळून आले. त्यानंतर चोरीला गेलेले वाहन जरीपटका परिसरात उभी आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक यांना गोपनीय सूत्रानुसार मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत जरीपटका परिसरातून चोरीला गेलेली पिकअप ताब्यात घेतली. चोरट्यांनी वाहनाचे नंबरमध्ये बदल केला होता. पोलिसांनी पिकअप ताब्यात घेत असताना घटनास्थळाजवळ थोड्या अंतरावर आयशर कंपनीच्या वाहनात सर्दूल सिंग हा बसला होता. पिकअप वाहनाची तपासणी होत असतानाच त्याने तिथून पळ काढला. पोलिसांना त्याचा संशय येताच सर्दूल सिंगचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेत असताना त्याच्याजवळ देशी कट्टा सहा जिवंत काडतूस, तसेच विविध प्रकारच्या चाव्या आढळून आल्या. यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी सर्दूल सिंग हा मूळचा हिमाचल प्रदेशचा रहिवासी असून सध्या तो नागपूर येथे रेणू चौधरी ( सुमित नगर ) जरीपटका यांच्या घरी रहात असे. सर्दूल याचा सदुसिंग एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

undefined

Intro:Anc : भंडारा शहरातून चोरीला गेलेली चार चाकी चा शोध घेत असताना आरोपीकडून देशी कट्ट्यासह सहा जिवंत काडतूस आणि दोन चोरीचे वाहन जप्त करण्यात आले असून याप्रकरणी सर्दूल सिंह उर्फ बलविंदर सिंग संधू याला अटक केली असून एक आरोपी फरार आहे या तपासानंतर मोठा रॅकेट पुढे येण्याची शक्यता असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Body:भंडारा येथील संत कबीर वार्डातील रहवासी गुणवंत तिडके याचे पिकप मालवाहू वाहन शहरातील बालाजी पेट्रोल पंप समोर नेहमीप्रमाणे उभे ठेवण्यात येत असे 15 जानेवारीला वाहन चालक सुनील कुरंजेकर याने पिक वाहन क्रमांक एम एच एन 3590 पेट्रोल पंपासमोर उभी करून निघून गेला त्याच रात्रीला अज्ञात चोरांनी सदर वाहन चोरून नेले वाहन चोरी गेल्याचे लक्षात येतात गुणवंत त्यांनी त्याच रात्री भंडारा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली पोलिसांनी तपास सुरू करून त्या क्षेत्रातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की गाडी चोर एका गाडीतून आले आणि ही गाडी सुद्धा घेऊन गेले त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक यांना गोपनीय सूत्रानुसार माहिती मिळाली की चोरी गेलेले वाहन जरीपटका परिसरात उभे आहे यात पोलिसांच्या पथकात पोलीस हवालदार बाबुराव भुसावळ पुरुषोत्तम शिंदे कीर्ती तिवारी अजय कुकडे बेनाथ बुरडे संदीप बंसोड कृष्णा काकडे यांच्यासह ताफा नागपूर येथे दाखल झाला 3 फेब्रुवारीचा रात्रीच्या सुमारास सापळा रचून जरीपटका परिसरातील सदर पिकप वाहन ताब्यात घेण्यात आले. चोरट्यांनी या महान वरील गुणवंत तिडके यांचे मोबाईल क्रमांक आणि वाहनावरील क्रमांक मिटविले होते मात्र चुकीने वाहनाच्या काचेवरील एका ठिकाणी लिहिलेला मोबाईल नंबर तसाच राहिला वाहनावरील खोडतोड त्या परिसरात राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबर कॉल करून माहिती मिळवली आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी पिकप ताब्यात घेतात पिकप पासून थोड्या अंतरावर आयशर कंपनीच्या वाहनात सर्दूल सिंग हा बसला होता पिकअप वाहनाची तपासणी होत असतानाच त्याने तिथून पळ काढला पोलिसांना त्याचा संशय येताच सर्दूल सिंगचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले त्याच्या घराची झडती घेत असताना देशी कट्टा सहा जिवंत काडतूस घ मॅक्स गाडी 6 चाकी ट्रक आणि विविध प्रकारच्या चाव्या तिथे आढळून आल्या.
आरोपी सर्दूल सिंग हा मूळचा हिमाचल प्रदेश इथला राहणार असून सध्या तो नागपूर येथे रेणू चौधरी सुमित नगर जरीपटका यांच्या घरी रहात आहे. सर्दूल सिंग यांच्याकडे मिळालेल्या आयसर गाडीचे ही हरियाणा पासिंग होती तर त्यावर असलेली नंबर प्लेट की ओरिसा पासिंग होती सदुसिंग त्याचा एक साथीदार फरार असून गाडी चोरी करणे त्यावरचे केस नंबर बदलवून खोट्या कागदपत्राआधारे त्यांची पासिंग बदलविणे आणि विकणे असा हा रॅकेट सुरू असावा आणि यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात आरोपी सापडण्याची आणि टारगेट उघडण्याची शक्यता पोलिसांना आहे
बाईट : चौहान, पोलीस निरीक्षक, भंडारा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.