बंगळुरु Rishabh Pant 107 Meter Six : इथं सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट संघातील कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आणि 99 धावांची खेळी केली. मात्र, निराशाजनक बाब म्हणजे पंतचं शतक अवघ्या 1 धावेनं हुकलं. या खेळीत पंतनं 9 चौकार आणि 5 षटकारही मारले. यावेळी त्यानं मारलेला एक षटकार थेट स्टेडियमच्या बाहेर मारला.
𝗢𝘂𝘁 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗣𝗮𝗿𝗸! 😍
— BCCI (@BCCI) October 19, 2024
Rishabh Pant smacks a 1⃣0⃣7⃣m MAXIMUM! 💥
Live - https://t.co/FS97Llv5uq#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/4UHngQLh47
पंतनं मारला गगनचूंबी षटकार : खरं तर, पंतनं भारतीय डावाच्या 87व्या षटकात टीम साऊथीच्या पहिल्याच चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, पंत पहिल्या चेंडूवर चुकला पण नंतर त्याला चार बाय मिळाले. यानंतर दुसऱ्या चेंडूवर तो सावधपणे खेळला. यानंतर पंतसमोर तिसरा चेंडू साऊथीनं टाकताच तो पुढे आला आणि त्यानं स्लॉग स्वीप करत मिडविकेटवर षटकार ठोकला. पंतनं हा षटकार तब्बल 107 मीटर लांब मारला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऋषभ पंतनं हा षटकार 90 धावांवर खेळत असताना मारला. पंतचा हा षटकार इतका शानदार होता की न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स अवाक झाला. या षटकारानंतर तो आपल्या शतकाच्या अगदी जवळ आला, पण तरीही पंतनं स्वत:ला रोखलं नाही. त्यामुळं त्याचं शतक हुकलं. मात्र, बाद होण्यापूर्वी पंतनं सर्फराज खानसोबत 177 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचं काम केलं. विशेष म्हणजे पंत जखमी असूनही तो भारतीय संघा फलंदाजीसाठी मैदानात उतरला.
GLENN PHILLIPS REACTION ON RISHABH PANT'S 107M SIX. 😲 pic.twitter.com/z84mD2GMhb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2024
कसोटी क्रिकेटमध्ये षटकार मारण्याच्या बाबतीत ऋषभ पंत सहाव्या स्थानावर : या सामन्यात ऋषभ पंतनं दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पाच षटकार ठोकले. यासह आता ऋषभ पंत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. ऋषभ पंतनं यात कपिल देवला मागं टाकलं आहे. कपिल देवनं 131 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 61 षटकार मारले होते. तर ऋषभ पंतनं आतापर्यंत 64 षटकार ठोकले आहेत. या यादीत माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग पहिल्या क्रमांकावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागनं भारतासाठी सर्वाधिक 103 सामन्यांत 90 षटकार ठोकले आहेत.
THE AUDACITY FROM RISHABH PANT. 🥶
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2024
- Batting on 90 and slog swept Southee for a 107M six. 🤯 pic.twitter.com/XafVEmu5G9
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज :
- वीरेंद्र सेहवाग - 90 षटकार
- रोहित शर्मा - 88* षटकार
- एमएस धोनी - 78 षटकार
- सचिन तेंडुलकर - 69 षटकार
- रवींद्र जडेजा - 66* षटकार
- ऋषभ पंत - 64* षटकार
RISHABH PANT SMASHED A 107M SIX AND SENT THE BALL OUT OF THE CHINNASWAMY. 🤯🔥 pic.twitter.com/1naANPKB29
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2024
हेही वाचा :