नारायणपूर (छत्तीसगड) : आयईडी बॉम्बच्या स्फोटाट 2 आयटीबीपी जवानांना वीरमरण आलं. ही घटना शनिवारी दुपारी 12 वाजता घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. नक्षलवाद्यांनी छत्तीगडमधील बिजापूरमध्ये आयईडी स्फोट घडवून आणला. या नक्षलवाद्यांनी पेरलेल्या प्राणघातक स्फोटात दोन जवानांना वीरमरण आलं. तर दोन पोलिसही गंभीर जखमी झालेत. जखमी जवानांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
साताऱ्यातील जवानाला वीरमरण : वीरमरण आलेल्या जवानांमध्ये अमर पवार हे महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवासी आहेत. तर दुसऱ्या जवानाचं नाव राजेश असं आहे. राजेश हे आंध्र प्रदेशातील कडप्पा येथील रहिवासी आहेत. दोन्ही जवान आयटीबीपीच्या 53 व्या बटालियनमध्ये होते
गावावर शोककळा : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आईडी स्फोटात सातारा जिल्ह्यातील खंडाळ्याचे सुपूत्र अमर शामराव पवार (वय ३६) यांना वीरमरण आलं. आयटीबीपीच्या ५३ व्या बटालियनमध्ये ते कार्यरत होते. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
शेतकरी कुटुंबातील : आयटीबीपीच्या जवानांचं संयुक्त पथक धुरबेराला निघालं असताना नक्षलवाद्यांनी आईडी स्फोट घडवून आणला. त्यामध्ये अमर पवार यांना वीरमरण आलं. ते बावडा (ता. खंडाळा, जि. सातारा) गावातील शेतकरी कुटुंबातील होते. छत्तीसगडमधील नारायणपूर कॅम्पमध्ये ते कार्यरत होते. स्फोटात गंभीररित्या जखमी झाल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरच्या साह्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. मात्र, उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आलं.
कुटुंबासह मित्रपरिवारावर शोककळा : अमर पवार यांचं प्राथमिक शिक्षण बावडा गावात झालं होतं. गावातील सार्वजनिक कार्यक्रमात ते सहभागी व्हायचे. त्यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि सात वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. .
नारायणपुर जिले के ग्राम कोडलियर के समीप जंगल में आईईडी ब्लास्ट की चपेट में आने से आईटीबीपी के 2 जवान वीरगति को प्राप्त हो गए। ब्लास्ट में 2 पुलिस जवानों के घायल होने की भी दुःखद सूचना प्राप्त हुई है।
— Vishnu Deo Sai (@vishnudsai) October 19, 2024
ईश्वर से शहीद जवानों की आत्मा की शांति एवं शोकाकुल परिजनों को संबल प्रदान…
IED स्फोटात दोन जवानांना वीरमरण आलंय. या स्फोटात दोन पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली. वीरमरण आलेल्या जवानांच्या आत्म्याला शांती मिळो आणि कुटुंबीयांना बळ मिळो, जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. : विष्णू देव साई, मुख्यमंत्री
नारायणपूरच्या पोलीस अधीक्षकांनी पुष्टी केली : नारायणपूरचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, दोन जखमी जवानांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं. "जवानांचं संयुक्त पथक धुरबेरा येथून निघालं होतं. सकाळी 11:30 ते 12 वाजेच्या दरम्यान IED चा मोठा स्फोट झाला. या घटनेनंतर परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे," अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.