How To Make Egg 65: आपल्यापैकी बरेच जण चायनिज फूडचे दिवाने आहेत. त्यामधील मटण 65, चिकन 65 सर्वांनी ट्राय केलं असेलच. परंतु तुम्ही कधी एग्ज 65 खाल्लं का? ते खाल्लं नसेल तर तुम्ही देखील स्वतः रेस्टॉरेंट स्टाईल एग्ज 65 घरच्या घरी तयार करू शकता. तेही काही मिनिटातंच.
- कसं तयार करावं एग्ज 65?
- साहित्य प्रमाण
- बेसन 1/2 कप
- मैदा 2 टीस्पून + 2 टीस्पून
- कॉर्नस्टार्च 1 टेबलस्पून
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार पाणी
- उकडलेली अंडी 4 नग
- तेल 1 टीस्पून आणि तळण्यासाठी
- दही 1/2 कप
- लाल मिरची पावडर 1.5 टीस्पून
- गरम मसाला पावडर 1 टीस्पून
- हळद पावडर 1/4 टीस्पून
- धने पावडर 1 टीस्पून
- हिंग 1/2 टीस्पून
- मोहरी 1 टीस्पून
- लाल मिरची 4-5 तुकडे
- आलं चिरून 1 टीस्पून
- चिरलेला लसूण एक टीस्पून
- हिरवी मिरची 3-4 तुकडे चिरून
- कढीपत्ता
- कोथिंबीर
- तेल
तयार करण्याची पद्धत
- सर्वप्रथम अंडी उकळून घ्या.
- एक मिक्सिंग बाऊल घ्या. त्यात उकडलेल्या अंड्याचे लहान तुकडे करा.
- त्यांनतर आलं लसूनांचे बारीक तुकडे त्यात घालून मिक्स करा.
- त्यात अर्धा वाटी बेसन घाला.
- आता मिरी, धणे, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला.
- या मिश्रणात एक कच्चा अंडा फोडून घाला.
- सर्व मिश्रण एकजीव करुन घ्या.
- आता मिश्रणाचे लहान-लहान गोळे करून मंद आचेवर तेलात अर्धवट तळून घ्या
- मिश्रण तयार करण्यासाठी पाण्याचा वापर करू नये.
- तळलेले बॉल्स बाजूल ठेवा.
- आता दुसरं पॅन घ्या. त्यात दही, मैदा, तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला आणि पाणी घालून मिक्स करा.
- या मिश्रणात अर्धवट तळलेली अंडी घालून पुन्हा कुरकुरीत होईपर्यंत तळा.
- दुसरं पॅन घ्या त्यात तेल घाला आणि तेल, हिंग, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची, आलं, लसूण, हिरवी मिरची घालून परतून घ्या.
- यात तळलेले अंड्याचे बॉल्स घाला.
- तुमचे एज्ग 65 तयार आहे. सजावटीकरिता तुम्ही वरून कोथिंबीर घालू शकता.
हेही वाचा