ETV Bharat / state

'जून'मध्ये सुरू आहे नाले सफाई, पावसाने दांडी मारल्याने पालिकेचे पितळ पडले नाही उघडे - नगरपालिकेने

पावसाळा सुरू होण्याअगोदर नालेसफाई होणे अपेक्षित असते. मात्र, भंडारा नगरपालिकेने जून महिन्यात नालेसफाईची कामे हाती घेतले आहे. अश्या वेळेस  पाउस लवकर आला असता तर महापालिकेचा पावसाच्या नियोजन संदर्भातील ढिसाळपणा पुढे आला असता. मात्र, पावसाने दांडी मारल्याने नगर पालिकाली वाचली.

माहिती देतांना ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याधिकारी, भंडारा नगरपालिका
author img

By

Published : Jun 30, 2019, 12:04 AM IST

भंडारा- पावसाळा सुरू होण्याअगोदर नालेसफाई होणे अपेक्षित असते. मात्र, भंडारा नगरपालिकेने जून महिन्यात नालेसफाईची कामे हाती घेतले आहे. अशा वेळेस पाऊस लवकर आला असता तर महापालिकेचा पावसाच्या नियोजन संदर्भातील ढिसाळपणा पुढे आला असता. मात्र, पावसाने दांडी मारल्याने पालिकेचे पितळ उघडे पडले नाही.

मे महिन्याच्या शेवटपर्यंत शहरातील मोठे नाल्यांची सफाई होणे अपेक्षित असते. मात्र, यावर्षी आचारसंहिता असल्यामुळे निविदा काढून खाजगी लोकांना नालेसफाईचे काम देण्यास उशीर झाला. त्यामुळे भंडारा शहरातील मोठे नालेसफाईचे कार्य जून महिन्यात सुरू करण्यात आले. २५ जूनपर्यंत शहरातील फक्त ५० टक्केच मोठे नाले साफ झाले असून उर्वरित नालेसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे विश्वास भंडारा नगरपालिकेचे मुख्यधिकारी यांनी दाखविला आहे.

माहिती देतांना ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याधिकारी, भंडारा नगरपालिका

दरवर्षी १ जून ते १० जूनच्या दरम्यान वरून राजा हजेरी लावतो. मात्र, यावर्षी २५ जून पर्यंत भंडारा शहरात पाऊसच पडला नसल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे पाण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र, पाऊस न येण्याचा फायदा भंडारा नगरपालिकेला होत आहे. जर या २५ दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली असती तर सफाई न झालेल्या मोठ्या नाल्यांचे सांडपाणी लोकांच्या घरात शिरले असते. मात्र, सुदैवाने अजून पर्यंत पाऊस बरसला नाही, त्यामुळे भंडारा नगरपालिकेचा गलथान कारभार समोर आलेला नाही.

दरवर्षी पावसामध्ये भंडारा शहरात बऱ्याच भागात पाणी साचते. हे पाणी लोकांच्या घरातही जाते. त्यामुळे, नागरिकांचे मोठे नुकसान आणि हाल होतात. मात्र, एवढे असूनही प्रशासन नालेसफाईच्या कामात अजिबात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. सध्या भंडारा नगरपालिकेचे ढिसाळ नियोजन बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यातच नगराध्यक्ष हे खासदार झाल्यापासून दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत असल्याने नगरपालिकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बरेचदा निर्णय घेताना अडचण निर्माण होत आहे.

शहरातील लहान नाल्यांना नगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या माध्यमातून साफ केले जाते. मात्र, मोठे नालेसफाई करण्यासाठी खाजगी कर्मचारी लावून सफाई केली जाते. कंत्राटदारही ६० पैकी केवळ ३० लोकांनाच सफाईसाठी पाठवत असल्याने कामाला पाहिजे तशी गती मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. आचारसंहिता असल्याने कामे उशिरा सुरू झाली असली तरी येणाऱ्या काही दिवसात शंभर टक्के नालेसफाई होईल असे भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे.

Intro:ANC : पावसाळा सुरू होण्याअगोदर नालेसफाई होणे अपेक्षित असते मात्र भंडार नगरपालिकेने जून महिन्यात नालेसफाईची कामे हाती घेतले आहे. सध्या पावसाने दांडी मारल्याने नगर पालिकेचे पितळ उघडे पडले नाही, मात्र जर का पावसाचे दमदार आगमन झाले तर मात्र नाल्याचे पाणी लोकांच्या घरात घुसणार आहे एवढं मात्र नक्की, आचारसंहिता असल्याने खाजगी लोकांकडून कामे करून घेण्यास विलंब झाले असले तरी येत्या काहीच दिवसात नाले सफाई पूर्ण होईल असा विश्वास भंडारा नगरपालिकेचे मुख्यधिकारी यांनी दाखविला आहे.

Body:मे महिन्याच्या शेवटपर्यंत शहरातील मोठे नाल्यांची सफाई होणे अपेक्षित असते मात्र यावर्षी आचारसंहिता असल्यामुळे निविदा काढून खाजगी लोकांना नालेसफाईचे काम देण्यास उशीर झाला त्यामुळे भंडारा शहरातील मोठे नालेसफाईचे कार्य जून महिन्यात सुरू करण्यात आले 25 जून पर्यंत शहरातील फक्त पन्नास टक्के मोठे नाले हे सावध झाले असून उर्वरित नालेसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत.

दरवर्षी 1 जून ते 10 दहा जून च्या दरम्यान वरून राजा हजेरी लावतो मात्र यावर्षी 25 जून पर्यंत भंडारा शहरात पाऊसच पडला नसल्याने शेतकरी हे सर्वसामान्य नागरिकांचे पाण्यासाठी धावपळ सुरू आहे मात्र पाऊस न येण्याचा फायदा भंडार नगरपालिकेला होत आहे जर या पंचवीस दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली असती तर सफाई न झालेल्या मोठ्या नाल्यांचा सांडपाणी लोकांच्या घरात शिरला असतात मात्र भंडारा नगरपालिकेचा सुदैवाने अजून पर्यंत पाऊस बरसला नाही.

दरवर्षी पावसामध्ये भंडारा शहरात बऱ्याच भागात पाणी वाचतो आप आणि लोकांच्या घरातही जातो त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान आणि हाल होतात मात्र एवढे असूनही प्रशासन नालेसफाईच्या कामात अजिबात गंभीर नसल्याचे दिसून येत आहे

सध्या भंडारा नगरपालिकेचे ढिसाळ नियोजन बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यातच नगराध्यक्ष हे खासदार झाल्यापासून दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत असल्याने नगरपालिकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळेच बरेचदा निर्णय घेताना अडचण निर्माण होत आहे.

शहरातील लहान मुलांना नगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या माध्यमातून साप केले जाते मात्र मोठे नाले सफाई करण्यासाठी खाजगी कर्मचारी लावून सफाई केली जाते कंत्राटदाराला त्याचा कान त्रास दिलेला आहे तो 60 पैकी केवळ तीस लोकांना सफाईसाठी पाठवत असल्याने कामाला पाहिजे तशी गती मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे आचारसंहिता असल्याने कामे उशिरा सुरू झाली असली तरी येणाऱ्या काही दिवसात शंभर टक्के नालेसफाई होईल असे भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे.
बाईट : ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याधिकारी, भंडारा नगरपालिका

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.