ETV Bharat / state

'बहिरंगेश्वर' मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने भक्तांची मांदियाळी; परिसरात भरतो मातीच्या भांड्यांचा बाजार

महाशिवरात्री निमित्ताने आज(शुक्रवार) संपूर्ण जिल्ह्यात महादेवाच्या मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. भंडारा शहरातील प्रसिद्ध 'बहिरंगेश्वर' मंदिरातही पहाटेपासूनच भक्तांची मांदियाळी सुरू आहे. रात्री बारा वाजेपर्यंत या मंदिरात जवळपास वीस हजारांवर भाविकांनी दर्शन घेतले आहे.

bahirangeshwar
बहिरंगेश्वर
author img

By

Published : Feb 21, 2020, 9:33 PM IST

भंडारा - महाशिवरात्री निमित्ताने आज(शुक्रवार) संपूर्ण जिल्ह्यात महादेवाच्या मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. भंडारा शहरातील प्रसिद्ध 'बहिरंगेश्वर' मंदिरातही पहाटेपासूनच भक्तांची मांदियाळी सुरू आहे. रात्री बारा वाजेपर्यंत या मंदिरात जवळपास वीस हजारांवर भाविकांनी दर्शन घेतले आहे. तर, या मंदिराच्या परिसरात आजपासून मातीच्या भांड्यांचा मोठा बाजार भरतो. जिल्ह्यातील गायमुख, कोरम्बी, झरी, चुलबंद या प्रमुख स्थानासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा भरते.

'बहिरंगेश्वर' मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने भक्तांची मांदियाळी

भंडारा शहरातील आणि जवळच्या गावातील नागरिक श्रद्धास्थान असलेल्या बहिरंगेश्वर मंदिरात येऊन मोठ्या भक्तिभावाने शिवलिंगाची पूजा अर्चना करतात. पहाटे पाच वाजल्यापासून या मंदिरात पूजा अर्चना सुरू होते. भक्तांसाठी सकाळी सहा ते रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे असते. हे मंदिर भंडाऱ्याच्या लोकांसाठी श्रद्धेचे स्थान असल्याने खासदार, आमदार, नगराध्यक्ष आणि सर्व नेते मंडळी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक रांगेत उभे राहून दर्शन घेतात.

मातीच्या भांड्यांचा बाजार -

महाशिवरात्रीच्या दिवसापासून या मंदिराच्या परिसरात मातीच्या सामानाचा बाजार भरतो. गरिबांचा फ्रिज म्हणून प्रसिद्ध असलेला पाण्याचा माठ, स्वयंपाकासाठी लागणारी मातीचे भांडे, चहाचे कप, पैशांचे गुल्लक, मातीच्या सजावटीच्या गोष्टी अशा एकापेक्षा एक मातीच्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी ठेवली जातात. मातीचे मडके सोडले तर बाकीच्या सर्व गोष्टी या कोलकाता येथून आणल्या जातात. देवाचे दर्शन घेतल्यानंतर नागरिक या मातीच्या वस्तू खरेदी करतात. महाशिवरात्रीच्या दिवसापासून होळीपर्यंत हा बाजार सुरू असतो. आधुनिक जगात स्वयंपाकघरात नवनवीन वस्तू आल्याने मातीच्या भांड्यांची मागणी कमी झाली. मात्र, या बाजारात आल्यावर असे लक्षात येते की, अजूनही या मातीच्या वस्तू घेण्याकडे लोकांचा कल आहे.

हेही वाचा -

'मराठवाडा वॉटर ग्रीड होणार, पण...'

'या' निर्णयामुळे १० लाख लोक‍ांवर अन्याय, काका-पुतण्याचे खरे चेहरे जनतेसमोर'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.