ETV Bharat / state

भंडाऱ्यात प्लास्टिकबंदीबाबत प्रशासन उदासीन - bhandara news

दीड वर्षाआधी, म्हणजे 29 जून 2018 ला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशानुसार 50 मायक्रॉनच्या खालील सर्व प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली. मात्र, यानंतर भंडारा जिल्ह्यात या सर्व कारवाया आता पूर्णपणे बंद झालेल्या आहेत.

bhandara
भंडाऱ्यात प्लास्टिकबंदी
author img

By

Published : Dec 10, 2019, 9:13 AM IST

भंडारा- शहरामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे. सुरुवातीचे काही महिने या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यासाठी अधिकाऱ्यांनी कारवाया केल्या. मात्र, वर्षभरामध्ये या कारवाया पूर्णपणे थांबल्या आहेत. याविषयी प्रदूषण विभागातील अधिकाऱ्यांना आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता आमच्या कारवाया सुरू आहेत, असे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. त्यामुळे वर्षभराआधी शासनाने काढलेल्या प्लास्टिक पिशवी बंदी निर्णय हा त्याच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून कचरापेटीत टाकण्यात आला आहे.

भंडाऱ्यातील प्लास्टिकबंदीवरील उदासीनतेवर 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा

दीड वर्षाआधी, म्हणजे 29 जून 2018 ला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा अध्यादेश काढला. या अध्यादेशानुसार 50 मायक्रॉनच्या खालील सर्व प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली. आदेश काढताच भंडारा शहरातही नगरपालिकेचे लोक सक्रिय झाले. आणि सुरुवातीला एक ते दोन महिने काही प्रमाणात कारवाया ही केल्या. या दीड वर्षाच्या कालावधीत नगरपालिका आणि प्रदूषण विभाग यांच्यामार्फत केवळ तीस लोकांवर कारवाया केल्या असून त्यांच्याकडून 78 किलो प्लास्टिक जप्त केला आहे. त्यांच्याकडून एक लाख 55 हजार रुपये वसुली करण्यात आली. मात्र, यानंतर या सर्व कारवाया आता पूर्णपणे बंद झालेल्या आहेत.

यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शहरातील गांधी चौकात, राजीव गांधी चौकात, जिल्हा परिषद चौक किंवा खात रोड, कुठेही गेले तरी रस्त्यांशेजारी बसलेले किरकोळ भाजी विक्रेते, फळविक्रेते हे या पिशव्यांचा सर्रास वापर करतात. तसेच मिठाईचे दुकान, लहान दुकानदार आणि काही प्रमाणत मोठ्या दुकानातही या प्लास्टिकच्या पिशव्या ग्राहकांना दिल्या जातात. याविषयी कोणीही कॅमेरासमोर बोलण्यास तयार झाले नाही. मात्र, जिथून उत्पादन होते तेच बंद करा, म्हणजे पिशव्या मिळाल्याच नाही तर आम्ही विकणार तरी कुठून, असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

खरंतर कायदे बनवणे जेवढे सोपे आहे त्यापेक्षा कायद्याची अंमलबजावणी करणे हे तेवढेच कठीण असते प्लास्टिक कॅरीबॅग पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रदूषण विभाग आणि नगरपालिकेमध्ये एक वेगळे कर्मचाऱ्यांची टीम तयार करावी लागेल पण जिथे पहीलेच कर्मचारी कमी आहे तिथे हा नवीन काम होणार तरी कसा असा प् दबक्या आवाजात बोलले जात आहे. याविषयी अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी गेले असता प्रदूषण विभागाचे अधिकारी ही गोंदियाला होते तर मुख्याधिकारी बाहेर दौऱ्यावरून तर नगर परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपलब्ध नव्हते त्यामुळे हे अधिकारी किंवा पदाधिकारी कार्यवाही का थांबली आहे या विषयी काय उत्तर देतात हे मात्र समजू शकले नाही.

भविष्यात तरी प्लास्टिक बंदीचा या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी शासन एक वेगळी यंत्रणा निर्माण करून काही कठोर पावले उचलेल,अशी अपेक्षा आहे.

Intro:Body:Anc : भंडारा शहरामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे.
सुरुवातीचे काही महिने या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यवाही केल्या मात्र वर्षभरामध्ये कार्यवाही पूर्णपणे थांबले आहे. याविषयी प्रदूषण विभागातील अधिकाऱ्यांना आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता आमच्या कारवाया सुरू आहेत असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. त्यामुळे वर्षभर पहिले शासनाने काढलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग बंदी निर्णय हा त्याच प्लास्टिकच्या कॅरीबॅग मध्ये गुंडाळून डस्टबिन मध्ये घातला गेलेला आहे.

दीड वर्ष पहिले म्हणजे 29 जून 2018 ला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक कॅरीबॅग वर बंदी आणण्याचा अध्यादेश काढला या अध्यादेशानुसार 50 मायक्रॉनच्या खालील सर्व प्लास्टिकच्या वापरावर बंदी करण्यात आली. आदेश काढताच भंडारा शहरातही नगरपालिकेचे लोक सक्रीय झाले आणि सुरुवातीला एक ते दोन महिने काही प्रमाणात कार्यवाही पण केल्या. या दीड वर्षाच्या कालावधीत नगरपालिका आणि प्रदूषण विभाग यांच्यामार्फत केवळ तीस लोकांवर कार्यवाही केली असून त्यांच्याकडून 78 किलो प्लास्टिक जप्त केला गेलाय त्यांच्याकडून एक लाख 55 हजार रुपये वसुली करण्यात आले मात्र यानंतर या सर्व कारवाया आता पूर्णपणे बंद झालेले आहेत.

कार्यवाही पूर्णपणे बंद झाल्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शहराच्या गांधी चौकात, राजीव गांधी चौकात, जिल्हा परिषद चौक किंवा खात रोड कुठेही गेले तरी रस्त्याशेजारी बसलेले किरकोळ भाजीविक्रेते फळविक्रेते हे या कॅरीबॅग चा सर्रास वापर करतात तसेच मिठाई चे दुकान, लहान दुकानदार आणि काही प्रमाणत मोठ्या दुकानात या प्लास्टिकच्या कॅरीबॅग ग्राहकांना दिल्या जातात, या विषयी कोणीही कॅमेरासमोर बोलण्यास तयार झाले नाही मात्र जिथून उत्पादन होते तेच बंद करा म्हणजे पिशव्या मिळाल्याच नाही तर आम्ही विकणार तरी कुठून असा प्रतिप्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.

खरंतर कायदे बनवणे जेवढे सोपे आहे त्यापेक्षा कायद्याची अंमलबजावणी करणे हे तेवढेच कठीण असते प्लास्टिक कॅरीबॅग पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रदूषण विभाग आणि नगरपालिकेमध्ये एक वेगळे कर्मचाऱ्यांची टीम तयार करावी लागेल पण जिथे पहीलेच कर्मचारी कमी आहे तिथे हा नवीन काम होणार तरी कसा असा प् दबक्या आवाजात बोलले जात आहे. याविषयी अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी गेले असता प्रदूषण विभागाचे अधिकारी ही गोंदियाला होते तर मुख्याधिकारी बाहेर दौऱ्यावरून तर नगर परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपलब्ध नव्हते त्यामुळे हे अधिकारी किंवा पदाधिकारी कार्यवाही का थांबली आहे या विषयी काय उत्तर देतात हे मात्र समजू शकले नाही.
भविष्यात तरी प्लास्टिक बंदीचा या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी शासन एक वेगळी यंत्रणा निर्माण करून काही कठोर पावले उचलतील अशी अपेक्षा.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.