ETV Bharat / state

Tiger Killed Shepherds : दोन नागरिकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात अखेर यश - वाघाने हल्ला करत त्याचा ही बळी घेतला

पवनी तालुक्यात दोन नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघाला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. या वाघाने बुधवारी एका शेळी चारणाऱ्या नागरिकाला ठार केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वनविभागाच्या पथकावर हल्ला केला होता.

Tiger Killed Shepherds
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 29, 2023, 7:05 AM IST

Updated : Jun 29, 2023, 7:19 AM IST

भंडारा : एकाच आठवड्यात दोन नागरिकांचा बळी घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. या नरभक्षी वाघाने पवनी परिसरातील दोन नागरिकांचा बळी घेऊन चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या पथकावर हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यामुळे नागरिकांच्या वाढत्या दबावाने भंडारा गोंदिया वनविभागाच्या पथकाने अखेर या वाघाला जेरबंद केले.

नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात अखेर यश

पवनी परिसरात वाघाने घेतला बळी : पवनी तालुक्यातील जंगल परिसरातील गुडगाव येथील एका व्यक्तीचा 23 तारखेला वाघाने बळी घेतला होता. त्यानंतर हा वाघ परिसरात नेहमीच दिसत होता. गुरुवारी परिसरातील एका गावात वाघाने वासराला ठार केले होते. त्यामुळे लोकांमध्ये आधीच प्रचंड रोष होता. बुधवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान खातखेडा येथील ईश्वर सोमा मोटघरे हे शेळ्या चारण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला करत त्याचा ही बळी घेतला.

गावकऱ्यांचा वनविभागाच्या पथकावर हल्ला : बुधवारी वाघाने शेळा चारणाऱ्या नागरिकाचा बळी घेतल्याने नागरिक चांगलेच संतप्त झाले. परिसरातील गावात वाघाने बळी घेतल्याची माहिती पसरताच नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी गोळा झाले. तर भंडाऱ्याचे सहाय्यक उपवनरक्षक यशवंत नागुलवार त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. वनविभागाचे पथक येताच गावकऱ्यांनी त्यांच्यावर लाठ्याकाठ्याने हल्ला केला. या हल्ल्यात उपवनरक्षक नागुलवार, वनपाल वावरे तथा गुप्ता गंभीर जखमी झाले. त्यांना ताबडतोब भंडारा येथे व तिथून नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.

मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात : नागरिकांनी वनविभागावर हल्ला केल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. ठार झालेल्या ईश्वर मोटघरे यांचा मृतदेह पुढील कारवाईसाठी नेताना गावकऱ्यांच्या संतापाचा सामना प्रशासनाला करावा लागला. अखेर पोलिसांच्या संरक्षणात ही संपूर्ण कारवाई केली गेली. या नरभक्षी वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी लावून धरली. पोलिसांकडून नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले जात होते, मात्र नागरिक गर्दी करून होते. तेवढ्यात वाघाने पुन्हा एका तरुणावर हल्ला केला. जखमी झाल्याने या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळाजवळ वाघाला केले जेरबंद : दुपारनंतर शेवटी वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करायचे आदेश वनविभागाने दिले. लगेच वाघाचा ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून शोध सुरू करण्यात आला. सोबतच भंडारा गोंदिया आणि नागझिरा येथील आरआरटी पथक वाघाला पकडण्यासाठी बोलण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वनविभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहा वनक्षेत्र अधिकारी आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल होते. ड्रोन आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाघाचा शोध घेतला जात असताना घटनास्थळाच्या काही अंतरावर शोध पथकाला वाघाचे दर्शन झाले. वाघाला बेशुद्ध करण्यासाठी आलेल्या शार्प शूटरने वाघाला बेशुद्ध केले. वाघ बेशुद्ध झाल्याची खात्री होताच बचाव दलाच्या सदस्यांनी वाघाला पिंजऱ्यात टाकून जेरबंद केले. वाघ जेरबंद झाल्याचे कळताच गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही कार्यवाही भंडारा आणि गोंदियाच्या वनविभागाच्या पथकाने पार पाडली.

हेही वाचा -

  1. Tiger Attack : वणी तालुक्यातील रांगणा येथे तरुणावर वाघाचा हल्ला; तरुण जागीच ठार
  2. नागपुरात वाघाचा मृत्यू; चंद्रपुरात पाच जणांचा घेतला होता बळी
  3. वनमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अखेर मृतदेह उचलला, सिंदेवाही तालुक्यात वाघाचा तिसरा बळी

Last Updated : Jun 29, 2023, 7:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.