ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात एकाच दिवशी पाच नव्या रुग्णांची नोंद, एकूण रुग्णसंख्या पोहोचली आठवर.. - भंडारा कोरोना अपडेट

सोमवारी सकाळी नाशिकहून आलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला. त्यानंतर सायंकाळी पुन्हा अन्य चार लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेच समोर आले. हे चारही रुग्ण साकोली तालुक्यातील असून ते पुण्यावर आले होते.

भंडारा जिल्ह्यात एकाच दिवशी 5 नवीन रुग्ण, रुग्णसंख्या 8

author img

By

Published : May 18, 2020, 9:36 PM IST

भंडारा - रेड झोनमधून आलेल्या लोकांमुळे भंडारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा अचानक वाढला. सोमवारी तब्बल पाच नवीन रुग्ण आढले आहेत. यामध्ये पुण्यातून साकोली येथे आलेल्या चार इसमांना तर नाशिकवरून आलेल्या एका तरुणाला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. भंडारा जिल्हा हा नऊ तारखेला कोरोनामुक्त झाला होता. मात्र, त्यानंतर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतून विशेष म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक अशा रेड झोनमधून लोक येण्यास सुरुवात झाली आणि भंडारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढायला लागला.

भंडारा जिल्ह्यात एकाच दिवशी 5 नवीन रुग्ण, रुग्णसंख्या 8

१६ तारखेला पुण्यावरून आलेल्या २ लोकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तर १४ तारखेला नाशिकवरून ट्रकने अवैध प्रवास करून एक १९ वर्षीय तरुण भंडाऱ्यात आला. सोमवारी सकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला. त्यानंतर सायंकाळी पुन्हा लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेच समोर आले. हे चारही रुग्ण साकोली तालुक्यातील असून ते पुण्यावर आले होते.

भंडारा जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याबरोबरच त्यांना इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करण्यात आले होते. यादरम्यान त्यांचे नमुने घेण्यात आले असून त्यांचे नमुने आज पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्वच रुग्ण इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन असल्याने त्यांच्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या संपर्कात ते आले नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव सामान्य लोकांना होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात रेड झोनमधून नागरिक येत असल्यानेही अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भंडाऱ्यात आता कोरोनाबाधित लोकांची संख्या ८ झाली असून एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे, तर उर्वरित ७ लोकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना विशेष रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.