ETV Bharat / state

तुमसरचे आमदार चरण वाघमारेंसह भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटेंवर विनयभंगाचा गुन्हा

महिला पोलीस अधिकाऱ्याशी अर्वाच्य भाषेचा वापर करत गैरवर्तन केल्याने तुमसरचे आमदार चरण वाघमारे तसेच भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमसरचे आमदार चरण वाघमारे आणि शहर अध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
author img

By

Published : Sep 19, 2019, 7:22 AM IST

भंडारा - महिला पोलीस अधिकाऱ्याशी अर्वाच्य भाषेचा वापर करत गैरवर्तन केल्याने तुमसरचे आमदार चरण वाघमारे तसेच भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्या विरोधात तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आमदार वाघमारेंनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा - संतापजनक! आदिवासी विवाहितेची सामूहिक बलात्कार करून हत्या

सोमवारी (१६ सप्टेंबर)ला तुमसर बाजार समितीमध्ये कामगारांसाठी सुरक्षा किट वाटपाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी उपस्थित महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे उपस्थित एका गर्भवती महिलेला अशा परिस्तिथी घरी कशी जाशील? असे विचारले असता, तिथे उपस्थित भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्यांना तुम्ही त्यांच्या घरी पेटी पोहोचवून देणार असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना असे न बोलण्याची विनंती केली. मात्र, जिभकाटे यांनी थेट भांडणाला सुरुवात करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यानंतर तिथे आमदार चरण वाघमारे आले आणि त्यांनीही त्या महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत बोलले आणि नंतर अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याचे हात पकडून धक्का दिला.

दरम्यान, या प्रकरणी महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून आमदार आणि शहर अध्यक्ष यांच्या विरुद्ध भा. दं. वि. कलम ३५३, ३५४, ४७२,५०४,५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आमदार आणि शहर अध्यक्ष्यांना सध्या अटक करण्यात आलेली नाही.

हेही वाचा - गुंगीचे औषध देवून अल्पवयीन मुलीवर 3 वर्षे वारंवार बलात्कार; आरोपींमध्ये पीडितेच्या आईचाही समावेश

कामगार सुरक्षा किट वाटपाचा शेवटचा दिवस असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले होतो. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या महिला पोलिसांशी असभ्य वागलो, त्यांचा विनय भंग केल्याचा चुकीचा आरोप माझ्यावर होत आहे. असे आमदार चरण वाघमारेंनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी मला मुद्दाम गोवण्यात येत असल्याचा आरोप करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.

Intro:Body:ANC : 16 सप्टेंबरला तुमसर बाजार समिती मध्ये कामगारांच्या सुरक्षा किट वाटपाचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू असतांना नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी उपस्थित महिला पोलीस अधिकारी यांनी तिथे उपस्थित एका गर्भवती महिलेला अश्या परिस्तिथी घरी कशी जाशील असे विचारले असता तिथे उपस्थित भाजपा शहर अध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्यां तुम्ही त्यांच्या घरी पेटी पोहचवून देणार असे म्हंटल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना असे न बोलण्याची विनंती केली मात्र जिभकाटे यांनी त्यांच्याशी भांडण सुरू करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केले त्यानंतर तिथे आमदार चरण वाघमारे आले आणि त्यांनीही त्या महिला अधिकारी ला अर्वाच्य भाषेत बोलले आणि नंतर अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याचे हात पकडून धक्का दिला,
या प्रकरणात चांगलीच हादरलेल्या महिला अधिकाऱ्यांनी 18 तारखेला पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली, या तक्रारीवरून आमदार आणि शहर अध्यक्ष यांच्या विरुद्ध 353, 354, 472, 504,506, 34 नुसार गुन्हा दाखल केले आहे. सध्या आमदार आणि शहर अध्यक्ष यांना अटक केली नाहीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.