ETV Bharat / state

रोमान्सचा अतिडोस उठला प्रियकराच्या जिवावर? प्रेयसीसोबत लॉजवर घालवली रात्र; सकाळी अचानक मृत्यू - प्रियकराचा अचानक मृत्यू

भंडारा शहरातील बसस्थानकासमोरील एका लॉजवर प्रेयसीसोबत रात्र काढणाऱ्या प्रियकराचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. लॉजमध्ये शक्तीवर्धक गोळ्याही सापडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Boyfriend Spent Night With His Girlfriend

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2023, 4:39 PM IST

भंडारा : शहरातील बसस्थानकासमोरील एका लॉजवर प्रेयसीसोबत रात्र काढणाऱ्या प्रियकराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मृत तरुण नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील रहिवासी आहे. लॉजमध्ये शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या आढळून आल्या आहेत. सर्व गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

लॉजवर तरुणाचा मृत्यू : मृत तरुणाचे गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुक्यातील एका तरुणीवर प्रेम होते. दोघेही 19 ऑगस्ट रोजी एकमेकांना भेटण्यासाठी भंडारा येथे आले होते. दोघेही दिवसभर शहरात फिरायला गेले होते. संध्याकाळी खरेदी केल्यानंतर त्यांनी लॉजवर एकत्र रात्र काढली. त्यानंतर मुलीने सकाळी मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो काहीच हालचाल करत नसल्याचे लक्षात येताच तरुणीने तातडीने लॉजच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली.

आकस्मिक मृत्यूची नोंद : त्यानंतर तरुणाला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तरुणाचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तरुणाच्या रक्ताचे नमुने अधिक तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.

मृत्यूचे कारण अस्पष्ट : अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांनी सांगितले. ज्या खोलीत तरुणाचा मृतदेह सापडला, त्या खोलीत शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या सापडल्या आहेत. त्यापैकी 100 मिलीग्रॅमच्या दोन गोळ्या तरुणाने घेतल्या असाव्यात, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पूर्वीही घडली होती घटना : अशीच एक घटना काही दिवसापूर्वी नोएडातील सेक्टर 27 मधील एका हॉटेलमध्ये घडली होती. प्रियकर त्याच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये गेला होता. काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर तरुणाचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. तशाच प्रकारची ही घटना आज भंडरा शहरातील एका लॉजवर घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र या घटनेचा तपशील शवविच्छेदन अहवाल पूर्णपणे हाती आल्यानंतरच समोर येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.