भंडारा - सॅनफ्लॅग कंपनीत कार्यरत असलेेले अजय थानथराटे यांचा कामावर असताना अपघात झाला. या अपघातात अजय यांना आपला पाय गमवावा लागला. त्यांच्यावर नागपूर येथिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी ही घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुुुुुुुुमारास घडली. दरम्यान एका महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने कंपनीतील कामगारात धास्ती निर्माण झाली आहे.
अजय थानथराटे मंगळवारी नियमित वेळेवर कामावर हजर होते. दरम्यान त्यांच्या पायावर लोखंडी रॉड पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी भंडारा येथे नेण्यात आले. दुखापत गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले. जखम गंभीर असल्याने त्यांचा पाय कापण्यात आला. सध्या त्यांच्यावर नागपूर येथील दवाखान्यात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
सॅनफ्लॅग कंपनीत अपघात वाढ झाली आहे. एक महिन्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एका कामगार युवकाचे बोट कापण्यात आले होते. सध्या कंपनीत कमी मनुष्यबळ कामावर बोलावून मोठ्या प्रमाणात उत्पादन काढणे सुरू आहे. त्यामुळे कामगारांवर कामाचा लोड वाढत आहे. माणस कमी आणि काम जास्त असल्याने जोखीम वाढली आहे. त्यामुळे अपघातात वाढ झाली असल्याच कामगाराचं म्हणणं आहे.