बीड - तालुक्यातील लोणी येथील फळ उत्पादक शेतकरी जयसिंग जाधव यांनी आपली कैफियत मांडली आहे. जाधव यांच्या शेतात एकूण तीन एकर क्षेत्रावर फळबाग आहे. यामध्ये दीड एकर क्षेत्रावर टरबूज तर दीड एकर क्षेत्रावर खरबूज लागवड केलेली आहे. ही दोन्ही फळपिके आता काढणीला आलेले आहेत. साधारणता टरबुजाचे उत्पादन 25 टन तर खरबूज 19 ते 20 टन निघेल. टाळेबंदी नसती तर 10 ते 12 रुपये किलोने टरबूज विक्री झाली असते. मात्र, आता किलोमागे चार ते पाच रुपये देखील भाव मिळेल का नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा सर्व माल टाळेबंदी नसते तर औरंगाबाद, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या शहरांमध्ये सहजपणे विक्रीसाठी गेला असता, मात्र आता टाळेबंदी होत असल्याने सर्वच प्रमुख शहरातील बाजारांची स्थिती अत्यंत खराब आहे. परिणामी तीन एकर फळबाग क्षेत्रांमध्ये 14 ते 15 लाख रुपये उत्पन्न मिळाले असते. मात्र, आता चार लाख देखील उत्पन्न मिळेल की, नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे शेतकरी जयसिंग जाधव म्हणाले.
टाळेबंदीचा फटका : आता आम्ही पिकवलेले टरबूज-खरबूज विकायचे कुठे? शेतकऱ्यांनी मांडली कैफियत...! - बीड कोरोना अपडेट
दुसऱ्या टप्प्यात लागलेल्या टाळेबंदीचा फटका व्यापाऱ्यांप्रमाणेच शेतकऱ्यांना देखील बसत आहे. शेतकऱ्यांचे कलिंगड विक्रीसाठी तयार झाले आहेत. बळीराजाने लाखो रुपयांचा खर्च करून पिकवलेला आपला माल (टरबूज- खरबूज) टाळेबंदीमुळे विकायचा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला हा आढावा.