बीड - आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांनी प्रचार थांबल्यानंतर रविवारी एका ठिकाणी भाषण करताना उपस्थितांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे त्यांच्याकडून आचारसंहितेचा भंग केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात निवडणूक आयोग काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रचार संपल्यानंतरही धोंडे यांच्या भाषणाची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
हेही वाचा - किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा; 'त्या' वक्तव्याबाबत धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण
परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आष्टी येथे निषेध व्यक्त करण्यासाठी मूक मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान, आष्टीचे भाजप उमेदवार भीमराव धोंडे यांनी रविवारी भाषण करत असताना कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करा, असे आवाहन उपस्थित जनतेला केले. एकंदरीत प्रचार तोफा थडवल्यानंतर अशा पद्धतीने भाषण करणे आचारसंहितेचा भंग आहे का? असेल तर निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.