बीड - तालुक्यातील कपिलधार वाडी-बीड रस्त्यावर स्कार्पिओ दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. हरीश कांबळे (वय 30), सचिन सुरवसे ( वय 32) हे जागीच ठार झाले, तर संतोष काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धर्मराज वीर गंभीर जखमी आहेत, त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चौघे शनिवारी मांजरसुंबा मार्गे कपिलधार वाडीकडे जात होते. घाटातील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली. या भीषण अपघातात हरीश व सचिन यांचा मृत्यू झाला, तर धर्मराज व संतोष यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.