बीड - जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामधील मुगगाव परिसरात अचानक डझनभर कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. सध्या बर्ड फ्लूची भीती असल्याने कावळ्यांच्या मृत्यूमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पशू वैद्यकीय विभागाने मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्यांच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी मृत कावळ्यांचे मास प्रयोगशाळेकडे पाठविले आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी विजय देशमुख यांनी दिली.
चौकशी होणे गरजेचे
या कावळ्यांचा मृत्यू कशामुळे होत आहे. याची चौकशी होणे देखील गरजेचे असल्याचे पक्षी तथा प्राणी मित्र सिध्दार्थ सोनवणे यांनी म्हटले आहे.
शवविच्छेदन अहवालानंतर उलगडणार कावळ्यांच्या मृत्यूचे रहस्य
कावळ्यांचा आचानक मृत्यू कशामुळे होत आहे. याबाबत त्या कावळ्यांचे अवशेष हे पुण्याला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय देशमुख यांनी दिली. अहवाल आल्यानंतरच त्या कावळ्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा उलगडा होणार आहे. तर कावळ्यांचा मृत्यू कशामुळे होत आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी प्राणीमित्र करत आहेत.
हेही वाचा - परळीत कोविड लसीकरण सरावफेरीला पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुरूवात
हेही वाचा - 55 टक्केपेक्षा जास्त संसार मोडण्यास मोबाईल जबाबदार!