ETV Bharat / state

बीडमध्ये कर्जबाजारीपणाचा बळी, ग्रामपंचायत सदस्याची विष पिऊन आत्महत्या

बीडमध्ये ग्रामपंचायत सदस्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे.

author img

By

Published : Aug 3, 2019, 11:26 PM IST

आत्महत्याग्रस्त ग्रामपंचायत सदस्य

बीड - जिल्ह्यातील कामखेडा येथील एका विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने कर्जबाजारीपणामुळे ८ दिवसापूर्वी विष पिले होते. त्याच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज (शनिवारी) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बबन दादाराव ढोले असे या व्यक्तीचे नाव आहे.

बबन यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ८ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते, अखेर शनिवारी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.

बबन हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यांनी छावणी चालवायला घेतली होती. यासाठी त्यांनी व्याजाने पैसे काढले होते. ते पैसे परत करण्याच्या तणावातून त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Intro:खालील बातमीचा फोटो उपलब्ध होत नाही. फोटो उपलब्ध झाल्यास अपलोड करतो..
******
कर्जबाजारीपणामुळे विष पिऊन आत्महत्या; बीड जिल्ह्यातील कामखेडा येथील घटना

बीड- जिल्ह्यातील कामखेडा येथील एका विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने कर्जबाजारीपणामुळे आठ दिवसापूर्वी विषप्राशन केले होते. मागील आठ दिवसापासून बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते अखेर शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बबन दादाराव ढोले (रा. कामखेडा ता. बीड) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, आठ दिवसापूर्वी बबन ढोले यांनी कर्जबाजारी पणामुळे विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते, अखेर शनिवारी त्यांची अचानक प्रकृती खालावल्याने प्राणज्योत मालवली. बबन ढोले हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यांनी छावणी देखील चालवायला घेतली होती. चारा छावणी वरील जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला होता. त्यांनी व्याजाने पैसे काढले होते. ते पैसे परत करण्याच्या तणावातून बबन ढोले यांनी विष पिऊन आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. या प्रकरणात पुढील तपास पोलीस करत आहेत.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.