ETV Bharat / state

वाळू माफियांची मुजोरी; जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर चालवला टिप्पर, घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा बॉडीगार्ड जखमी

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या कार चालवला टिप्पर

author img

By

Published : May 29, 2023, 8:55 AM IST

Updated : May 29, 2023, 1:31 PM IST

07:14 May 29

वाळू माफियांची मुजोरी; जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर चालवला टिप्पर, घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा बॉडीगार्ड जखमी

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ

बीड : जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी वाढली आहे. वाळूची तस्करी करणारे वाळू माफिया आता अधिकाऱ्यांच्या जिवावर उठले आहेत. असाच प्रकार औरंगाबद- नगर मार्गावर घडला आहे. वाळू माफियावर कारवाई करताना थेट जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या गाडीवर वाळूचा टिप्पर घालण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा बॉडीगार्ड जखमी झाला आहे. दरम्यान या प्रकरणात टिप्पर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

सिनेस्टाईलने केला पाठलाग : या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगरहून बीडकडे येताना गेवराई जवळ वाळू वाहतूक केली जात होती. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना बीडकडे वाळू वाहून घेऊन जाणारा टिप्पर दिसला. या टिप्परवर कारवाई करण्यासाठी मुधोळ यांच्या गाडीने टिप्परला ओव्हरटेक केला. त्यानंतर जिल्हाधिकारी मुधोळ आणि अंगरक्षक हे कारवाई करण्यासाठी आपल्या वाहनातून खाली उतरले. पण टिप्पर चालकाने अधिकाऱ्यांच्या गाडीवर टिप्पर चालवत जिल्हाधिकाऱ्यांचा वाहनाला धडक देत टिप्पर तेथून पळवून लावला. याच दरम्यान दीपा मुधोळ यांचे बॉडीगार्ड अंबादास तावणे यांनी टिप्पर चालकाला पकडण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकत चालकाला पकडण्यासाठी टिप्परला लटकले होते. त्यानंतर जिल्ह्याधिकाऱ्यांनी टिप्परचा पाठलाग सुरू केला. तब्बल 3 किलोमीटरपर्यंत सिनेस्टाईल पद्धतीने हा पाठलाग करण्याचा थरार धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळाला. यात बॉडीगार्ड जखमी झाला आहे. कार चालक आणि जिल्हाधिकारी दीपा मुधोळ हे सुखरुप आहेत.

जिल्हाधिकारी वाळू माफियांच्या टार्गेटवर : दरम्यान एलसीबीकडून टिप्पर चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या. मात्र यातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे. गेवराई आणि माजलगाव तालुक्यात सर्वाधिक वाळू उपसा होतो. यावर महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई केवळ तात्पुरत्या स्वरूपात असते. मुधोळ यांनी जिल्हाधिकाऱ्याचा पदभार घेतल्यापासून त्या वाळू माफीयांच्या टार्गेटवर आहेत. अशातच या घटनेमुळे प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आता वाळू माफियांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच लक्ष केल्याने एकच खळबळ माजली आहे.

Last Updated : May 29, 2023, 1:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.