बीड - पंकजा मुंडे यांच्याशिवाय महाराष्ट्रात दुसरी सक्षम महिला मुख्यमंत्री म्हणून कोणी दिसत नसल्याचे वक्तव्य प्रीतम मुंडे यांनी केले. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंकजाताईंसाठी परळी सभा घेत आहेत. याचाच अर्थ भविष्यात राज्याच्या राजकारणाची सूत्रे परळीतून हलवली जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या. प्रीतम मुंडेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु आहे.
ज्या ज्या वेळी विधानसभेच्या निवडणुका येतात, त्यावेळी हमखास एक चर्चा होते. ती म्हणजे महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? याबाबतच प्रीतम मुंडेंना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, पंकजा मुंडे यांच्याइतके सक्षम महिला नेतृत्व महाराष्ट्रात नाही. त्यांच्याइतकी सक्षम महिला मुख्यमंत्री म्हणून कोणी दिसत नसल्याचे त्या म्हणाल्या.
हेही वाचा - भारत-पाकिस्तान प्रश्न, अन् चीनची स्वार्थी भूमिका..!
हेही वाचा - पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस संपवायला निघालेत; विलासकाका उंडाळकरांचा हल्लाबोल
बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या पाठीमागे जनतेने खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांनी केले. भाजप सरकार समाजातील सर्व घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी ठरले आहे. आम्ही जेव्हा प्रचाराच्या निमित्ताने जनतेमध्ये जातो, तेव्हा आम्ही केलेल्या कामाची पावती आम्हाला सर्वसामान्य नागरिकांकडून मिळत असल्याचे प्रीतम मुंडे म्हणाल्या.
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे झालेल्या दसरा मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोरच पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा याबाबत घोषणाबाजी केली होती. त्याची राज्यभरात जोरदार चर्चा असतानाच गुरुवारी पुन्हा एकदा खासदार प्रीतम मुंडे यांनी 'पंकजा मुंडे यांच्या एवढी सक्षम महिला मुख्यमंत्री पदासाठी कोणी नसल्याचे म्हटले आहे.